प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मुलाने ५७ व्या मजल्यावरुन उडी मारून संपवले जीवन
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मुलाने ५७ व्या मजल्यावरुन उडी मारून संपवले जीवन
img
Dipali Ghadwaje
मुंबईतील कांदिवली परिसरातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मुलाने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. बुधवार (२ जुलै) रोजी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. ट्यूशन क्लासला न जाण्यावरुन रागात मुलाने इमारतीच्या ५७ व्या मजल्यावरुन खाली उडी मारली. यात मुलाचा जागीच मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील कांदिवली परिसरात सी ब्रुक येथे ही अभिनेत्रीचे घर आहे. गुजराती मालिकांमध्ये अभिनेत्री काम करत आहे. काल २ जुलै रोजी अभिनेत्री आणि तिच्या मुलामध्ये वाद झाला. अभिनेत्रीने मुलाला ट्यूशन क्लासला जायला सांगितले. पण मुलाला क्लासला जायची इच्छा नव्हती. यावरुन दोघांमध्ये वाद सुरु झाला.

आईवर रागावलेल्या मुलाने रागाच्या भरात इमारतीच्या ५७ व्या मजल्यावरुन उडी मारली. हा मुलगा थेट खाली पडला. इतक्या उंचीवरुन खाली पडल्याने मुलाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे अभिनेत्री आणि तिच्या पतीला मोठा धक्का बसला आहे. या दाम्पत्याचा तो एकुलता एक मुलगा होता. या घटनेमुळे मनोरंजनसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

मुलाने उडी मारल्यानंतर जोरदार आवाज झाला. आवाज ऐकून इमारतीतील लोक घटनास्थळी जमा झाले. त्यानंतर लगेचच पोलिसांना बोलवण्यात आले.

पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा सुरु केला. या प्रकरणी पोलिसांनी मुलाचा अपघाती मृत्यू झाल्याची नोंद केली आहे. पण ही आत्महत्या खरंच ट्यूशनला जाण्यावरुन झालेल्या वादामुळे झाली की यामागे इतर कोणते कारण आहे याचा पोलीस तपास करत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group