मोठी बातमी : नाशिकच्या आंदोलकांकडून मंत्रालयाच्या गेटवर आत्मदहनाचा प्रयत्न, आंदोलक ताब्यात
मोठी बातमी : नाशिकच्या आंदोलकांकडून मंत्रालयाच्या गेटवर आत्मदहनाचा प्रयत्न, आंदोलक ताब्यात
img
वैष्णवी सांगळे
दैनिक भ्रमर : देशभरात मोठ्या उत्साहात स्वतंत्रदिन साजरा होत असताना मुंबईतून मात्र धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वातंत्र्य दिनी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावरच आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. नाशिकच्या अंबडमधील अतिक्रमणाविरोधात आंदोलन करणारे आंदोलक मंत्रालयाबाहेर ठिय्या मांडून बसले होते. याचदरम्यान आदोलकाकडून आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला. 

जगातील सर्वाधिक उंचीवरील श्रीकृष्ण मंदिर; भक्तांचे भाग्य उजळणाऱ्या ‘टोपी’ ची अनोखी परंपरा

घटनेदरम्यान पोलिसांचा मोठा फौजफाटा मंत्रालयाबाहेर दाखल झाला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून आंदोलकांना रोखले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. आंदोलकर्त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आत्मदहनाचा प्रयत्न झाल्याने काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group