जगातील सर्वाधिक उंचीवरील श्रीकृष्ण मंदिर; भक्तांचे भाग्य उजळणाऱ्या ‘टोपी’ ची अनोखी परंपरा
जगातील सर्वाधिक उंचीवरील श्रीकृष्ण मंदिर; भक्तांचे भाग्य उजळणाऱ्या ‘टोपी’ ची अनोखी परंपरा
img
वैष्णवी सांगळे
दैनिक भ्रमर : जगभर ‘देवभूमी’ म्हणून हिमाचल प्रदेशची ओळख आहे. येथील देवी-देवता आणि निसर्गरम्य वातावरण या भूमीला पवित्र बनवते. याच देवभूमीत एक असे पवित्र कृष्ण मंदिर आहे, जे जगातील सर्वाधिक उंचीवरील श्रीकृष्ण मंदिर मानले जाते. पांडवांनी त्यांच्या अज्ञातवासाच्या काळात या मंदिराची स्थापना केली होती असे मानले जाते. या तलावाची परिक्रमा केल्याने माणसाची सर्व पापे धुतली जातात, अशीही मान्यता आहे. या मंदिराचं आणखी एक वैशिष्ट्य आहे ज्यामुळे भाविक मोठ्या संख्येने याठिकाणी येत असतात. येथील टोपीची अनोखी परंपरा काय आपण जाणून घेऊया. 

हिमाचल प्रदेशच्या किन्नौर जिल्ह्यातील ‘युला कांडा’ येथे एका तलावाच्या मधोमध भगवान श्रीकृष्णाचे हे छोटेखानी मंदिर वसलेले आहे.जन्माष्टमीच्या एक दिवस आधी भाविक युला कांडा येथे पोहोचतात. मंदिर समितीकडून त्यांच्या राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था केली जाते. हे मंदिर समुद्रसपाटीपासून तब्बल 12,000 फूट उंचीवर आहे. या प्राचीन मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी 14 किलोमीटरचा दुर्गम प्रवास पायी करावा लागतो. 

आजचे राशिभविष्य ! १५ ऑगस्ट २०२५, आजचा वार शुक्रवार ; कोणाला मिळणार आज गुड न्यूज ?

या उत्सवाचा इतिहास ‘बुशहर’ संस्थानाशी जोडलेला आहे. असे मानले जाते की, बुशहर संस्थानाचे तत्कालीन राजा केहरी सिंह यांच्या काळात हा उत्सव साजरा करण्याची परंपरा सुरू झाली. त्या काळात लहान स्तरावर साजरा होणार्‍या या उत्सवाला आज जिल्हास्तरीय दर्जा मिळाला आहे. मात्र, हा मेळा साजरा करण्याची परंपरा आजही शतकानुशतके जुनी आहे. 

भाग्य उजळणारी ‘किन्नौरी  टोपी’ ची अनोखी परंपरा
या मंदिराची सर्वात खास आणि रहस्यमय गोष्ट म्हणजे येथील परंपरा. जन्माष्टमीच्या दिवशी मंदिराशेजारी असलेल्या पवित्र तलावात ‘किन्नौरी टोपी’ उलटी करून सोडली जाते. जर ही टोपी न बुडता तरंगत दुसर्‍या किनार्‍यापर्यंत पोहोचली, तर तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होणार आणि तुमचे भाग्य उजळणार, असे मानले जाते. येणारे वर्ष तुमच्यासाठी आनंदाचे आणि भरभराटीचे असेल, असा हा संकेत असतो. मात्र, जर टोपी तलावात बुडाली, तर येणारे वर्ष कष्टदायक असू शकते किंवा तुमच्यावर काही संकट येणार आहे, असा अशुभ संकेत मानला जातो. विशेष म्हणजे, आपले नशीब आजमावण्यासाठी येथे देशातून मोठ्या संख्येने भाविक येत असतात. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group