मोठी दुर्घटना : पिकअप दरीत कोसळली; ६ मजुरांचा मृत्यू, तर ६ जण जखमी
मोठी दुर्घटना : पिकअप दरीत कोसळली; ६ मजुरांचा मृत्यू, तर ६ जण जखमी
img
Dipali Ghadwaje
हिमाचल प्रदेश येथे अपघाताची एक मोठी घटना समोर आली आहे. हिमाचल येथील शिमल्यात मजदुरांना घेऊन जाणाऱ्या पिकअपचा मोठा अपघात झाला आहे. या अपघात ६ मजुरांचा मृत्यू झाला आहे. तर जखमी मुजरांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी मदतीसाठी पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी धाव घेतली. हा अपघात कोणत्या कारणाने झालं याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात जखमी झालेल्या मजुरांना उपचारासाठी सुन्नी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शिमला एएसपी नवदीप सिंह यांनी घटलेना दुजोरा दिला आहे. राजधानी शिमल्यापासून ५० किमी अंतरावर मंडी जिल्ह्याच्या सीमेवर सुन्नी शहर आहे. या ठिकाणच्या कादरघाट येथे हा अपघात झाला आहे. 

या अपघातात ३ लोकांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जणांचा उपचारादरम्यान सुन्नी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. तर इतर ६ जण यात जखमी झाले आहेत. सोमवरी सकाळच्या सुमारास हा अपघात झाला आहे.

हिमाचलमधील सुनी ते किंगल जोडणाऱ्या लिंक रोडवर आज सकाळी ७ वाजता हा अपघात झाल्याचं सांगतिलं जात आहे. पिकअपमध्ये चालकासह १२ जण कडाघाटातील बाजाराकडे जात होते. कादरघाटापासून काही अंतरावर पिकअप खोल दरीत पडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group