आमदाराच्या कारने चिमुकलीला उडवले, अपघाताचा CCTV व्हिडिओ समोर
आमदाराच्या कारने चिमुकलीला उडवले, अपघाताचा CCTV व्हिडिओ समोर
img
वैष्णवी सांगळे
शिरूर नगर परिषदेच्या प्रचारासाठी पुण्याकडून शिरूरकडे निघालेल्या आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या भरधाव कारने ४ वर्षीय बालिकेला जोरदार धडक दिल्याची घटना रविवारी (३० नोव्हेंबर) दुपारी शिरूरच्या बोऱ्हाडेमळा येथे पुणे-अहिल्यानगर महामार्गावर घडली. शुभ्रा पंढरीनाथ बोऱ्हाडे (वय 4) असे या अपघातात गंभीर जखमी झालेल्या बालिकेचे नाव आहे

शिरूर नगरपरिषदेच्या प्रचारासाठी रविवारी दुपारीआमदार ज्ञानेश्वर कटके हे वाघोली येथून शिरूर येथे येत होते. दरम्यान, शुभ्रा बोऱ्हाडे ही चार वर्षीय मुलगी बोऱ्हाडे मळा येथील हुंदाई शोरूम समोर महामार्ग ओलांडत होती. एका कारच्या आडून ती अचानक आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या काळ्या रंगाच्या मर्सिडीज कार (क्र. एमएच१२, एनएक्स १३९१) समोर आली. 

कटके यांच्या चालकाने जोरदार ब्रेक दाबला. परंतु गाडीच्या वेगामुळे शुभ्राला समोरासमोर जोराची धडक बसली. यात ती चेंडूसारखी उडून काही फुट अंतरावर डांबरी रस्त्यावर पडली. यात ती गंभीर जखमी झाली. मुलीला जोरात धडक दिल्यानंतर कार थोडीही जागेवर थांबली नाही. ती भरधाव वेगात घटनास्थळावरून निघून गेल्याचे सीसीटीव्हीत दिसतेय.

आमदाराच्या कारने चिमुकलीला धडकल्याच्या या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. ४ वर्षांच्या शुभ्राला गंभीर दुखापत झाली आहे. दात पडणे, जबड्याला गंभीर दुखापत तसेच चेहऱ्याला खोल जखमा झाल्या आहेत, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group