महाराष्ट्र हादरला ! पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या, सुसाईड नोटमधून धक्कादायक कारण समोर
महाराष्ट्र हादरला ! पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या, सुसाईड नोटमधून धक्कादायक कारण समोर
img
वैष्णवी सांगळे
राज्याच्या पोलीस विभागातून खळबळजनक घटना समोर आली आहे. पुण्यात पोलीस अधिकाऱ्याने विष पिऊन जीवन संपवलं. पोलीस अधिकारी सांगलीच्या पोलीस विभागात कार्यरत होते. त्यांच्या आत्महत्येने पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.



डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका लॉजमध्ये पोलीस अधिकारी सुरज मराठे यांनी आत्महत्या केली आहे. ही घटना आज समोर आली असून, आजारपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचे पोलिसांना सापडलेल्या सुसाईड नोटमधून समोर आले आहे. सूरज मराठे हे सांगली पोलीस दलातील तासगाव येथे कार्यरत होते. अवघ्या २५ वर्षांचे असताना मराठे यांची सहायक पोलिस निरीक्षक म्हणून नेमणूक झाली होती.

निर्दयतेचा कळस ! प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या; दारू पाजली, डोळ्यात मिरची पावडर फेकली नंतर...

मिळालेल्या माहितीनुसार, सुरज मराठे हे लॉजमध्ये होते. काही वेळ संपर्क न झाल्याने लॉज कर्मचाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता, त्यांनी आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले.

पुणे जिल्ह्यातील देहू याठिकाणी त्यांचे कुटुंबीय वास्तव्यास आहे. सांगली पोलिस दलात कार्यरत असल्याने त्यांनी गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याने सुट्टी टाकली होती. त्यांना गुडघ्याच्या त्रास असल्याने ते पुणे शहरात उपचारासाठी येत असत. यंदा सुद्धा पुण्यात उपचारासाठी आलेल्या मराठे यांनी सुट्टी टाकली होती. पुण्यात आल्यावर उपचारासाठी गेल्यावर ते पुन्हा लॉजवर आले. त्यांनी त्यांच्या आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांना घटनास्थळी शेवटची चिठ्ठी मिळून आलेली आहे. अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group