पुन्हा राजकीय भूकंप ! भाजप, काँग्रेस , शरद पवार गटाचे १५ दिग्गज अजित पवारांच्या भेटीला
पुन्हा राजकीय भूकंप ! भाजप, काँग्रेस , शरद पवार गटाचे १५ दिग्गज अजित पवारांच्या भेटीला
img
वैष्णवी सांगळे
महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजताच सांगली-मिरज-कुपवाडमध्ये मोठा 'राजकीय भूकंप' झाला आहे. भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अशा प्रमुख पक्षांशी संबंधित तब्बल १५ हून अधिक माजी महापौर आणि नगरसेवक यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत सांगलीत मोठे शक्तीप्रदर्शन केले आहे. सोमवारी रात्री उशिरा या सर्व दिग्गज नेत्यांनी पुण्यात अजित पवार यांची भेट घेऊन पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब केले आहे. 

सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच, एका रात्रीत १५ दिग्गज फुटल्याने मिरज शहराच्या राजकारणाला मोठा वेग आला आहे. मिरज शहरात एकूण २७ जागा आहेत आणि या मोठ्या पक्षांतरामुळे तिन्ही पक्षांची डोकेदुखी वाढणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर 'दादां'नी मारलेला हा निर्णायक राजकीय डाव मानला जात आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार यांना भेटायला गेलेले हे सर्व नेते भारतीय जनता पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या प्रमुख पक्षांशी संबंधित आहेत. भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक शिवाजी दुर्वे , काँग्रेसचे माजी नगरसेवक करण जामदार आणि मिरजेचे माजी महापौर किशोर जामदार यांनी अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

सर्वात मोठा धक्का राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला बसला आहे, जिथे माजी महापौर मैनुद्दीन बागवान, आरिफ चौधरी, आणि चंद्रकांत हुलवान यांसारखे दिग्गज नेते पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. याशिवाय नर्गिस सय्यद, आजम काझी, रमजान सतारमेकर, अंकुश कोळेकर, जनसुराज्यचे आनंदा देवमाने आणि संतोष कोळी यांचाही या फुटलेल्या मोहरांमध्ये समावेश आहे. या भेटीदरम्यान अजित पवार यांच्यासोबत आमदार इद्रिस नायकवडी, जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील आणि पद्माकर जगदाळे हे उपस्थित होते.
इतर बातम्या
Join Whatsapp Group