अजितदादांच्या निधनाचं वृत्त समजताच अनेक गावात कडकडीत बंद
अजितदादांच्या निधनाचं वृत्त समजताच अनेक गावात कडकडीत बंद
img
वैष्णवी सांगळे
पवार यांचं विमान अपघातात निधन झाल्याची बातमी आली. ही बातमी ऐकल्यानंतर अनेकांना विश्वासच बसत नव्हता. आपले लाडके दादा आपल्यात नाहीत, हे सत्य पचवण खूप कठीण आहे. कारण महाराष्ट्राच्या विकासासाठी बरच काही करणारा आणि करु शकणारा एक नेता आपल्यातून आज निघून गेलाय. अजित पवारांची अकाली एक्झिट खरच महाराष्ट्राच्या प्रत्येक जनमनाला चटका लावणारी आहे. या घटनेनंतर राज्यातील अनेक गावात बंद पुकारण्यात आला. अनेक गावातील गालकऱ्यांनी स्वत:हून पुढे येत बंदचा निर्णय घेतला.

अजित पवारांची सासुरवाडी असलेल्या धाराशिवच्या तेर गावात संपूर्ण गाव बंद ठेवत सार्वजनिक दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. अजित पवारांच्या जाण्याने आमचं गाव पोरक झालं अशा भावना अजित पवारांची सासरवाडी तेर गावातील ग्रामस्थांनी भावना व्यक्त केल्या.व्यापारी वर्गाने आपापली दुकाने बंद करत अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली. तसेच या घटनेनंतर गावातील शाळांना आज सुट्टी देण्यात आली. 

तर अजित पवार यांच्या जाण्याने त्यांचं आजोळ असलेल्या अहिल्यानगरच्या देवळाली प्रवरा मध्येही शोकाकुल वातावरण आहे. देवळाली प्रवरा गावात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. याच गावात अजित पवार यांचा जन्म झाला होता. अवघ्या 3 महिन्यांपूर्वीच अजित पवार यांनी आजोळात दौरा केला होता. अजित पवारांचे मामेबंधू चंद्रशेखर कदम यांना अश्रू अनावर झाले होते.

अजित पवार हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्याच्या निधनानंतर बीड जिल्ह्यातील बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत. पालकमंत्री असलेले अजित दादा गेल्याने जिल्हाभर शोककळा पसरली आहे.संपूर्ण बीड शहर बंद ठेवून बीड बीड शहराला आणि जिल्ह्याला शिस्त घालून देणाऱ्या अजित दादांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अजितदादांच्या जाण्याने बीड जिल्ह्याचे मोठे नुकसान झाल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

तर या चटका लावणाऱ्या घटनेनंतर राज्यातील अनेक शहरदेखील बंद ठेवण्यात आली आहेत. राज्यात पुणे, बारामती, पिंपरी चिंचवड, रायगड, बुलढाणा, धाराशिव, येवला इत्यादी ठिकाणी पूर्णतः बंद पाळण्यात आला आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group