तीन वर्षात मराठा समाजाला २५ हजार कोटी अन् २५ वर्षांत ओबीसींना फक्त अडीच हजार कोटी; हा अन्याय कशासाठी ? प्रकाश शेंडगेंचा सवाल
तीन वर्षात मराठा समाजाला २५ हजार कोटी अन् २५ वर्षांत ओबीसींना फक्त अडीच हजार कोटी; हा अन्याय कशासाठी ? प्रकाश शेंडगेंचा सवाल
img
वैष्णवी सांगळे
ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत उपोषण केले होते, त्यांच्या उपोषणानंतर सरकारने हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीस मान्यता देणारा जीआर जारी केला. या निर्णयामुळे ओबीसी समाज मात्र चांगलाच आक्रमक झाला. दरम्यान येत्या काही दिवसात ओबीसी समाजानेही मुंबईत आंदोलनाचा पवित्र घेतला आहे. 

जावईबापू सासुरवाडीला वाद मिटवायला जाताना जरा काळजीच घ्या ! घरगुती वाद मिटवताना जावयालाच...

सरकारच्या जीआरला आव्हान देणाऱ्या याचिका कोर्टात दाखल होत असताना दुसरीकडे ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे .  अजित पवार केवळ एका समाजाचे नेते आहेत का? ते अर्थमंत्री मागील ३ वर्ष आहेत. खजान्याची चावी त्यांच्याकडे आहे त्यांनी ३ वर्षात मराठा समाजाला २५ हजार कोटी दिले आहेत आणि मागील २५ वर्षात ओबीसी समाजाला फकत अडीच हजार कोटी मिळाले आहेत. 

सरकारची कोंडी वाढणार ! मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत येणार

आम्ही आज सर्वांना विनंती करत आहोत की ओबीसीतील कोणत्याही समाजाने पीआयएल दाखल करू नये कारण आम्ही रिट पिटिशन दाखल करत आहोत. 
मराठा आंदोलन सुरू असताना अनेक आमदार मंत्री त्यांच्या स्टेजवर पहिला मिळाले मोर्चात देखील चालत होते त्यामुळे आता ओबीसी मंत्र्यांनी देखील आंदोलनात सहभागी व्हावे छगन भुजबळ यांनी महामोर्चात यावे असे आवाहन ओबीसी नेते प्रकाश शेंडगे  केले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group