अजित पवारांना मोठा धक्का; 7 आमदारांचा
अजित पवारांना मोठा धक्का; 7 आमदारांचा "या" पक्षात प्रवेश
img
दैनिक भ्रमर

नागार्लंडच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सर्वात मोठा धक्का बसला आहे. पक्षातील सात आमदारांनी पक्षाला रामराम ठोकत सत्ताधारी नॅशनल डोमोक्रॅटीक प्रोगेसिव्ह पार्टीत प्रवेश केला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नागार्लंडमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सात आमदार सत्ताधारी पक्ष नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीमध्ये सामील झाले. या विलीनीकरणामुळे मुख्यमंत्री नेफ्यू रिओ यांच्या नेतृत्वाखालील एनडीपीपीला 60 सदस्यांच्या विधानसभेत पूर्ण बहुमत मिळाले आहे, ज्यामुळे त्यांची संख्या 25 वरून 120 झाली आहे. नागालँड विधानसभेत एकूण 60 जागा आहेत, म्हणजेच आता एकट्या एनडीपीपीकडे बहुमत आहे.

राष्ट्रवादीमधील फूटीनंतर नागार्लंडमधील आमदारांनी अजित पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. 2023 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि  मित्रपक्ष भाजपने 12 जागा जिंकल्या होत्या. या निवडणुकीत राष्ट्रवादी राज्यातील तिसरा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला होता. तसेच अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी हा राज्यातील मुख्य आणि सर्वात मोठा विरोधी पक्ष होता. मात्र आता या सर्व आमदारांनी सत्ताधारी पक्षामध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, या प्रकरणात, सभापतींनी सांगितले की हे विलीनीकरण संविधानाच्या 10 व्या अनुसूची अंतर्गत वैध आहे आणि 2019 च्या 'आमदार अपात्रता नियमां'नुसार ते मंजूर करण्यात आले आहे.

नॅशनल डोमोक्रॅटीक प्रोगेसिव्ह पार्टीत सामील झालेल्या आमदारांची नावे खालीलप्रमाणे :
नामरी एन्चांग - टेनिंग विधानसभा
पिक्टो शोहे - अटोइझू विधानसभा
वाय. मोहोनबेमो हॅम्त्सो - वोखा टाउन विधानसभा
वाय. मानखाओ कोन्याक - मोन टाउन विधानसभा
ए. पोंगशी फोम - लॉंगलेंग विधानसभा
पी. लँगन - नोकलाक विधानसभा
एस. तोइहो येप्थो - विधानसभा

इतर बातम्या
Join Whatsapp Group