स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा झालीय. या निवडणुकांपूर्वी आता पक्षांतराला देखील वेग आला आहे. अनेक जण आपला पक्ष सोडून इतर पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत. महाविकास आघाडीमधून महायुतीमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे, तर काही जण आपल्याच मित्र पक्षात प्रवेश करत आहेत.
दरम्यान विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीला लागलेली गळती अजूनही सुरूच आहे. दरम्यान आता आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाला सर्वात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे लवकरच आता राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लवकरच जयदत्त क्षीरसागर हे राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान सध्या बीडसह मराठवाड्यात राज्यात हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतर मराठा विरोधात ओबीसी असं चित्र आहे.
याचा परिणाम हा या निवडणुकांवर देखील होण्याची शक्यात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जयदत्त क्षीरसागर यांच्या सारखा बडा ओबीसी नेता आता राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्यानं याचा मोठा फायदा हा जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाला होऊ शकतो.