रक्तरंजितराजकारण ! दृश्यमानता कमी मग सीसीटीव्हीतील फुटेज स्पष्ट कसे ? सुषमा अंधारेंचा सवाल; म्हणाल्या...
रक्तरंजितराजकारण ! दृश्यमानता कमी मग सीसीटीव्हीतील फुटेज स्पष्ट कसे ? सुषमा अंधारेंचा सवाल; म्हणाल्या...
img
वैष्णवी सांगळे
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने सर्वांनाच हादरा बसला आहे. बारामती येथे विमानाचे लँडींग होत असताना त्यांच्या विमानाचा अपघात झाला अन् अजित पवारांसह ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर कार्यकर्त्याच्याही भावना अनावर झाल्या असून अनेकजण या अपघाताची उच्चस्तरीय चौकशीची मागणी करत आहेत. 

अजित पवार यांच्या मृत्यू प्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यानंतर आता शिवसेनेच्या (उबाठा) उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सुषमा अंधारे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X'वर पोस्ट शेअर करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. बारामती विमानतळ परिसरात कमी दृश्यमानता असेल तर सीसीटीव्हीमध्ये विमान घिरट्या घालताना स्पष्टपणे कसं दिसतंय? या अपघाताची चौकशी आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा करू असं सत्ताधाऱ्यांमधला एकही नेता ठामपणे का बोलत नाही ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय.

सुषमा अंधारे यांची पोस्ट  
बारामती विमानतळावर कमी दृश्यमानता होती म्हणून अपघात झाला असे अनेकजण अपघाताचे कारण सांगत आहेत... पण खूप दूरच्या सीसीटीव्ही मध्ये विमान घीरट्या घालताना स्पष्ट दिसत होतं.. जर तिथे धुक्याचं वातावरण असेल तर सीसीटीव्हीतील घरट्या घालतानाचे फुटेज इतके स्पष्ट कसे? काल लगेच यावर बोलणं संकेताला धरून नसलं तरी तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केलेले प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत. ही चौकशी झालीच पाहिजे किंवा ही चौकशी आम्ही अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा करू असं सत्ताधाऱ्यांमधला एकही नेता ठामपणे का बोलत नाही ? अजित दादांच्या नंतर  पक्षातील जेष्ठता क्रम असणारे प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ किंवा दिलीप वळसे पाटील यांनी मौन का बाळगल आहे ? साहेबांचे राष्ट्रवादीतले ही ज्येष्ठ नेते यावर का बोलत नाहीत ? हे फक्त पवार कुटुंबाचे नुकसान नाही हे महाराष्ट्राचे नुकसान आहे. #रक्तरंजितराजकारण

इतर बातम्या
Join Whatsapp Group