'आता विखुरलेलं राहून चालणार नाही'; दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत बड्या नेत्याचं वक्तव्य
'आता विखुरलेलं राहून चालणार नाही'; दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत बड्या नेत्याचं वक्तव्य
img
वैष्णवी सांगळे
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांचं काल (बुधवारी, ता 28) विमान अपघातामध्ये दुर्दैवी निधन झालं आहे. मुंबईहून अजित पवार हे निवडणुकांच्या प्रचार सभांसाठी बारामतीकडे निघाले होते. मात्र विमान लँडिगदरम्यान दुर्घटना घडली आणि अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. अजित पवारांच्या निधनाने राज्यात हळहळ व्यक्त होत आहे. 

अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचे नेते तथा मंत्री नरहरी झिरवळ यांनी प्रतिक्रिया देत शोक व्यक्त केला आहे. मात्र, यावेळी बोलताना मंत्री नरहरी झिरवळ यांनी केलेलं एक वक्तव्य चर्चेत आलं आहे. ते एका खासगी वृत्त वाहिनीशी बोलत होते. ते म्हणाले, आता सर्वांची मागणी अशीच आहे की वहिनींना (सुनेत्रा पवार यांना) कुठेतरी मिनिस्ट्रीमध्ये आणावं. अशी जनतेची प्रामाणिक इच्छा आहे. त्या प्रमाणे वरिष्ठांबरोबर चर्चा करून तसा निर्णय घेण्याची विनंती करू” 

आता आणखी एक चर्चा आहे की महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र आले. पवार कुटुंब देखील एकत्र आलं. मग दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची ही वेळ आहे का? या प्रश्नावर बोलताना नरहरी झिरवळ म्हणाले की, “आता एकत्र आलेले आहेतच. त्यामुळे आणखी एकत्र येण्याला काय?”

दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येऊन सत्तेत सहभागी होतील का? असा प्रश्न विचारला. यावर बोलताना नरहरी झिरवळ म्हणाले की, “होईल, आपल्या संपूर्ण महाराष्ट्राची पूर्वीपासून तशी मागणी देखील होतीच. पण आता ही मागणी आणखी जोरकसपणे होईल. कारण आता असं विखुरलेलं राहून चालणार नाही. एकत्रच राहावं लागणार आहे, हे आपले विचार आहेत. तसेच सर्वसामान्यांचे देखील हेच विचार आहेत”, असं नरहरी झिरवळ यांनी म्हटलं आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group