अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणात मोठी अपडेट, राज्य सरकारने दिले महत्त्वाचे आदेश
अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणात मोठी अपडेट, राज्य सरकारने दिले महत्त्वाचे आदेश
img
वैष्णवी सांगळे
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी (ता.28) विमान अपघातात निधन झाले होते. त्यांच्यावर गुरुवारी (ता.29) शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार झाले. अजितदादांच्या निधनांतर राज्य सरकारने तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला होता. दरम्यान, आता या अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. राज्य सरकारने अजित पवारांच्या विमानाच्या अपघाताचे सीआयडी चौकशीचे आदेश दिले आहे. 

रक्तरंजितराजकारण ! दृश्यमानता कमी मग सीसीटीव्हीतील फुटेज स्पष्ट कसे ? सुषमा अंधारेंचा सवाल; म्हणाल्या...

अंत्यसंस्कार पार पडल्यानंतर सरकारने तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. या अपघाताचे गांभीर्य लक्षात घेता, सरकारने सीआयडी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता या अपघातातील गूढ उलगडण्याची आणखी दाट शक्यता आहे. अपघातस्थळावर कोणालाही जाऊ न देण्याच्या सूचनाही बारामती पोलीसांना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, फॉरेन्सिक टीमने आधीच या अपघातस्थळी जाऊन नमुने तपासणीसाठी गोळा केले आहेत. हा तपास करताना बारामती पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या एक्सिडेंटल डेथ रिपोर्टच्या अनुषंगाने तपास करण्यात येणार आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group