राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाल्याने महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात मोठा जनसमुदाय एकवटला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक मोठे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि अजित पवारांवर प्रेम करणारा मोठा जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित आहे.
दिवंगत नेत्याच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जात आहेत. हिंदू धर्माप्रमाणे अंतिम विधी सुरू झाले असून, संपूर्ण पवार कुटुंब आणि महाराष्ट्र या आघातातून सावरण्याचा प्रयत्न करत आहे.
तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर , केंद्रीय मंत्री रामदास आठवले, प्रतापराव जाधव, मुरलीधर मोहोळ, खासदार शाहू छत्रपती राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, छगन भुजबळ यांच्याकडून अजित पवारांना शेवटची श्रद्धांजली वाहण्यात आली.