खळबळजनक : मृतदेहाचे दोन तुकडे, अर्धवट जाळले अन्....; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याचा निर्घृण खून
खळबळजनक : मृतदेहाचे दोन तुकडे, अर्धवट जाळले अन्....; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याचा निर्घृण खून
img
Dipali Ghadwaje
कोल्हापुरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रामपंचायत सदस्याचा निर्घृण खून करण्यात आला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे

 मिळालेल्या माहितीनुसार ,  लखन बेनाडे असे ग्रामपंचायत सदस्याचे नाव आहे. बेनाडे हा हातकणंगले तालुक्यातील रांगोळी गावाच ग्रामपंचायत सदस्य होते. मागील आठ दिवसांपासून बेनाडे हे बेपत्ता होते, आज त्यांच्या हत्येची बातमी समोर आली आहे. बेनाडे यांच्या शरीराचे दोन तुकडे करून मृतदेह कर्नाटकमधील नदीत फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

बेनाडे यांच्या खून प्रकरणी चार संशयतांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतलं आहे. लखन बेनाडे याचा एका महिलेसोबत गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर वाद सुरू होता, त्यामधून ही हत्या झाल्याचा तपास पोलिसांकडून कऱण्यात येतोय.

दरम्यान मारेकर्‍यांनी पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने बेनाडे यांचा मृतदेहाचे दोन तुकड्यांत तोडलं, अर्धवट जाळला आणि हिरण्यकेशी नदीत संकेश्वरजवळ फेकून दिला. बेनाडे आठ दिवसांपासून बेपत्ता होते, आणि ही घटना सुमारे पाच ते सहा दिवसांपूर्वी घडल्याचा प्राथमिक अंदाज तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.

या घटनेमुळे रांगोळी आणि परिसरात तीव्र खळबळ उडाली आहे. बेनाडे यांच्या बेपत्त्याबाबत त्यांची बहीण नीता उमाजी तडाखे गावभाग पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.

एका वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार ,  पोलिसांनी सांगितले की ,  लखन बेनाडे यांचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. मागील काही महिन्यांपासून दोघांमध्ये वारंवार खटके उडत होते, त्यांच्या वादाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे संबंधित महिलेचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group