राजकीय भूकंप !बड्या महिला नेत्यासह संपूर्ण कुटुंबाची राष्ट्रवादीत एन्ट्री
राजकीय भूकंप !बड्या महिला नेत्यासह संपूर्ण कुटुंबाची राष्ट्रवादीत एन्ट्री
img
वैष्णवी सांगळे
निवडणुकीचे वारे जोरदार वाहन असताना पुण्यात अजित पवार गटाने काँग्रेसला धक्का दिलाय, माजी नगरसेविकेनं संपूर्ण परिवारासह पक्षप्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज खडकवासला विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी परिवार मिलन हा कार्यक्रम पार पडणार आहे. निवडणुकीच्या पूर्वी पक्षप्रवेश झाल्याने काँग्रेसला मोठा झटका मानला जात आहे. 


या कार्यक्रमादरम्यान, माजी नगरसेविका सुजाता शेट्टी, माजी स्थायी समिती अध्यक्ष सदानंद शेट्टी तसेच त्यांचे सुपुत्र साक्षात शेट्टी आज काँग्रेसची साथ सोडणार आहे. शेट्टी परिवाराने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

शेट्टी कुटुंबाचे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात दरारा आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेट्टी कुटुंबाने काँग्रेसला जय महाराष्ट्र केल्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे. त्यांनी आज अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.

१०१७ साली महापालिका निवडणुकीत सुजाता शेट्टी काँग्रेसमधून निवडून आल्या होत्या. तर, काही महिन्यांपूर्वी काँग्रेसने सदानंद शेट्टी यांना प्रदेश सरचिटणीस केले होते. पुण्यात काँग्रेसची ताकद वाढत होती. शेट्टी कुटुंब पुण्यात स्थिरावतच असतानाच अजित पवारांनी काँग्रेसला धक्का दिला असल्याची चर्चा आहे. गेल्या आठवड्यात काँग्रेसच्या नेत्यानं धक्का दिला होता. आज शेट्टी कुटुंबाने धक्का दिला.
इतर बातम्या
Join Whatsapp Group