मोठी बातमी ! पार्थ पवार जमीन घोटाळाप्रकरणी तहसीलदारांचे निलंबन
मोठी बातमी ! पार्थ पवार जमीन घोटाळाप्रकरणी तहसीलदारांचे निलंबन
img
वैष्णवी सांगळे
पुण्यातील १८०० कोटींची जमीन केवळ 300 कोटींमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीला विकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घोटाळ्याप्रकरणी संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. 



विरोधक याप्रकरणी आता आक्रमक झाले असून आता सरकारने कारवाईला सुरुवात केली आहे. पुण्यातील संबंधित जागे प्रकरणी तहसिलदारांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिल्यानंतर ही कारवाई झाली आहे. 

पार्थ पवारांना १८०० कोटींची जमीन ३०० कोटी रुपयांत विकल्याचे प्रकरण उजेडात आले, विशेष म्हणजे या व्यवहारात स्टँप ड्युटीही फक्त ५०० रुपये आकारण्यात आल्याचे दिसून आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच, व्यवहारात अनियमितता झाली असेल तर ते चुकीचं आहे. कुठेही अनियमितता झाली असेल तर कारवाई झालीच पाहिजे, या मताचे आम्ही आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते. 

याप्रकरणात आता पुणे तहसीलदार सूर्यकांत येवले यांचे निलंबन करण्यात आलं आहे. पार्थ पवार यांच्या कंपनीसाठी झालेल्या जमीन व्यवहारप्रकरणी तहसीलदारांनंतर दुय्यम निबंधक रवींद्र तारुही निलंबित झाले आहेत. याप्रकरणी, नोंदणीच बेकायदा असल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आलीय. आता, याप्रकरणी अजित पवार आणि पार्थ पवार काय भूमिका मांडतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group