मोठी बातमी : 'त्या' प्रकरणात पार्थ पवारांना दिलासा,  दमानिया भडकल्या , म्हणाल्या मग साहेब पार्थ पवारांना शिक्षा कोण देणार ?
मोठी बातमी : 'त्या' प्रकरणात पार्थ पवारांना दिलासा, दमानिया भडकल्या , म्हणाल्या मग साहेब पार्थ पवारांना शिक्षा कोण देणार ?
img
वैष्णवी सांगळे
पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. जमीन व्यवहार प्रकरणात पार्थ पवारांना दिलासा मिळाला आहे. पुण्यातील मुंढवा येथील जमीन गैर-व्यवहार प्रकरणात अखेर १८८६ पानांचे विस्तृत दोषारोपपत्र  दाखल करण्यात आले आहे. मात्र या आरोपपत्रामध्ये फक्त शीतल तेजवानी यांचेच नाव नमूद करण्यात आले आहे. 

या प्रकरणात दिग्विजय पाटील आणि पार्थ पवार यांची नावे आरोपपत्रामध्ये समाविष्ट करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे दोघांनाही दिलासा मिळाला आहे. दोषारोप पत्रामध्ये जमिनीच्या गैरव्यवहार प्रकरणी फक्त शितल तेजवानी यांच्यावरती आरोप ठेवण्यात आले आहेत, आर्थिक गुन्हे विभागाच्या दोषारोप पत्रामध्ये पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांचे नाव नाहीये. 

या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी कालच सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी केली होती. त्यानंतर आज ही मोठी घडामोडी समोर आली आहे. मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि आरोपी शीतल तेजवाणी हिच्याविरुद्ध पोलिसांनी न्यायालयात १८८६ पानांचे विस्तृत दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल केले आहे.याबाबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे. 

अंजली दमानिया यांची पोस्ट :
महाराष्ट्र हा फक्त राजकीय दलालीचा अड्डा झाला आहे का?  कायदा फक्त सामान्यांसाठीच आहे का?राजकारण्यांसाठी ‘न्याय’ हा शब्दच रद्द झालाय का? पुणे जमीन घोटाळा…. तपासाचे काहीच होत नाही….. त्यात शितल तेजवानी यांनी SP Civil Suit २२१३/२०२५ दाखल केला दिग्विजय पाटील यांच्या विरुद्ध आम्हाला पैसे मिळाले नाही म्हणून हा व्यवहार रद्द करा आणि दिग्विजय पाटील यांनी SP Civil Suit २३४७/२०२५ शितल तेजवानी यांच्या विरुद्ध, आम्हाला फसवलं म्हणून हा व्यवहार रद्द करा असा अर्ज केला आहे आणि कलेक्टर पुणे यांनी तर, हा व्यवहार ‘अवैध असून तो रद्द करण्यात यावा’ यासाठी अर्ज ८/१२/२०२५ रोजी अर्ज केला? मग साहेब  पार्थ पवारांना शिक्षा कोण देणार ? कशी देणार? का गुंडाळून टाकणार तुम्ही हा व्यवहार ? काय ही घाण ? ‘न्याय’ का शब्द राजकारण्यांना लागूच होत नाही का? असा सवाल दमानियांनी उपस्थित केला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group