अबब ! २७१.८५ कोटींची संपत्ती , निवडणुकीत उभा राहिलेला 'हा' श्रीमंत उमेदवार तुम्हांला माहित आहे का ? कुठून लढवतोय निवडणूक ?
अबब ! २७१.८५ कोटींची संपत्ती , निवडणुकीत उभा राहिलेला 'हा' श्रीमंत उमेदवार तुम्हांला माहित आहे का ? कुठून लढवतोय निवडणूक ?
img
वैष्णवी सांगळे
महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. महाराष्ट्रातील २९ महापालिका निवडणुकींसाठी मतदान होण्यास अवघे १२ दिवस शिल्लक आहेत आणि निकाल जाहीर व्हायला १३ दिवस बाकी आहेत. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून मुंबई, पुणे , नाशिक , छत्रपती संभाजीनगर या नगपालिकांची पालिकेची मोठी चर्चा आहे. अंतर्गत वाद , पक्षाकडून तिकीट न मिळाल्याने झालेला वाद , एबी फॉर्म गिळणे ही त्यामागची काही कारणे. त्यात नगरसेवक पदासाठी बडे बडे नेते रिंगणात उतरले आहेत. 

या सर्वात श्रीमंत उमेदवार कोण ? आणि तो निवडणूक कुटून लढवतोय हा प्रश्न अनेकांना पडला आहे. तर भाजपने उमेदवारी दिलेले सुरेंद्र पठारे हे पुण्याच्या निवडणुकीमध्ये उतरलेले सगळ्यात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ४ मधून सुरेंद्र पठारे निवडणूक लढवणार आहेत. त्यांच्याकडे तब्बल 271.85 कोटी रुपयांची संपत्ती आहे. सुरेंद्र पठारे यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांनी त्यांची मालमत्ता 271.85 कोटी रुपये एवढी दाखवली आहे. 

सुरेंद्र पठारे यांच्याकडे मर्सिडिज बेन्झ, बीएमडब्ल्यू आणि इनोव्हा क्रिस्टा अशा आलिशान गाड्या आहेत. रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक असून सुमारे 1.75 किलो सोन्याचे दागिने आहेत. दुसऱ्या क्रमांकावर खडकवासल्याचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांची मुलगी सायली वांजळे आहे. सायली वांजळे यांच्या नावावर 77.65 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

पुणे महानगर पालिकेची एकूण सदस्य संख्या १६२ आहे. पुण्यात भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व आहे. पुण्यात शेवटची महापालिकेची निवडणूक 2017 साली झाली होती. यात भाजपने 97 जागा जिंकून बाजी मारली होती.
इतर बातम्या
Join Whatsapp Group