जिवलग मित्रांमध्ये जुन्या मैत्रिणीला फोन लावण्यावरून वाद, कोयत्याने सपासप वार अन्...
जिवलग मित्रांमध्ये जुन्या मैत्रिणीला फोन लावण्यावरून वाद, कोयत्याने सपासप वार अन्...
img
वैष्णवी सांगळे
दोन जिवलग मित्रांमध्ये जुन्या मैत्रिणीला फोन लावण्यावरून कडाक्याचं भांडण झालं ,बरं हे भांडण इतक्यावरच थांबलं नाही हे भांडण इतकं पेटलं की एका मित्राने दुसऱ्या मित्रावर मित्रावर कोयता हल्ला केल्याची घटना पुणे येथे घडली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेतन चव्हाण असं हल्ला करणाऱ्या 23 वर्षीय तरुणाचं नाव आहे.

नेमकं काय घडलं?
आदित्य कांबळे आणि चेतन चव्हाण हे दोघे चांगले मित्र. दोघेही दोन फेब्रुवारीला संध्याकाळी भारती विद्यापीठ परिसरातील उसाच्या गाडी जवळ उभे होते. गप्पा मारत असताना जुन्या मैत्रिणीची आठवण निघाली आणि त्या मैत्रिणीला फोन करण्यावरून दोघांमध्ये भांडण झाली. हे भांडण इतके टोकाला गेले आणि आदित्य कांबळे याने मित्र चेतन चव्हाण यांच्यावर थेट कोयत्याने वार करायला सुरुवात केली, या हल्ल्यात चेतन गंभीर जखमी झाला आहे, त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत देखील झाली आहे, पुण्यातील भारतीय विद्यापीठ रुग्णालयात चेतन वर सध्या उपचार सुरू आहे.

दरम्यान, या संपूर्ण घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्या फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपासाला गती दिली आहे. आरोपी आदित्य कांबळे याच्याविरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गंभीर दुखापत केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. 

Pune |
इतर बातम्या
Join Whatsapp Group