खाकी वर्दीला डाग ! ड्रग्ज तस्करी करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यासह टोळीला पोलिसांकडून बेड्या
खाकी वर्दीला डाग ! ड्रग्ज तस्करी करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यासह टोळीला पोलिसांकडून बेड्या
img
वैष्णवी सांगळे
व्यसनाधीन तरुणाईला ड्रग्जच्या कचाट्यातून बाहेर आणण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहे. ड्रग्ज माफियांवर करडी नजर ठेवून त्यांना अटक करण्यात येत आहे. मात्र अशातच एका पोलीस कर्मचाऱयांच्या कृत्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.  पोलिसांच्या खाकी वर्दीला काळा डाग लावण्याचं काम अहिल्यानगर पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याने केलं आहे. अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांकडून एका पोलिसालाच अटक करण्यात आली आहे. शामसुंदर गुजर असे या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव असून अहिल्यानगर पोलीस दलात तो कार्यरत आहे. 

दरम्यान, अहिल्यानगर पोलीस दलातील काही अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात असून अहिल्यानगर पोलिसांनी जप्त केलेले अंमली पदार्थ मुद्देमाल कक्षातून चोरुन हा कॉन्स्टेबल हे अंमली पदार्थ बाहेर विकत होता. अहिल्यानगर पोलिस दलातील कॉन्स्टेबल शामसुंदर गुजर हा स्वतः अंमली पदार्थांची विक्री करत असल्याचं समोर आलंय. 

१७ जानेवारीला अहिल्यानगर पोलिसाच्या सहभागाच्या या प्रकरणाची सुरुवात झाली. जेव्हा पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील शादाब शेख या गॅरेज चालकाला पुणे पोलिसांनी अटक केली. शादाब शेख हा त्याच्या दुचाकीवरुन अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी येणार असल्याचं पुणे ग्रामीण पोलिसांना समजलं होतं. पोलिसांनी त्याला एक किलो अंमली पदार्थसह रंगेहात पकडलं. अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील ज्ञानदेव उर्फ माऊली शिंदे, ऋषिकेश चित्तर, महेश गायकवाड यांच्याकडून त्याने अंमली पदार्थ आणल्याचे त्याच्याकडे केलेल्या चौकशीतून समोर आलं आहे. 

पुणे पोलिसांनी या आरोपींना अटक केली असता त्यांच्याकडे उर्वरित 9 किलो 655 ग्रॅम वजनाचे अमली पदार्थ मिळून आले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ कुठून आणले याचा पोलिसांनी पुढे शोध सुरू केला असता हे अमली पदार्थ नगर पोलीस दलातील शामसुंदर गुजर याने त्यांना दिल्याचं समोर आलं. शामसुंदर गुजर हा अहिल्यानगर पोलीस दलात पोलीस हवालदार पदावर कार्यरत आहे. आत्तापर्यंत या प्रकरणात 10 किलो 707 ग्रॅम वजनाचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी अधिक तपास करायचा आहे, असे पुणे ग्रामीण पोलिसांनी सांगितले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group