पुण्यातील नवले पुल हा अनेकांसाठी मृत्यूला निमंत्रण देणारा ठरला आहे. या पुलावर होणारे अपघात यामुळे हा पूल सातत्याने चर्चेत येत असतो. याच अपघातांबाबत शिवसेना नेते वसंत मोरे फेसबूक लाईव्ह करत होते. नवले पुलावरील अपघात रोखण्याबाबत नेमक्या काय उपाययोजना करता येतील या विषयावर ते लाईव्ह दरम्यान बोलत होत.
त्याच दरम्यान एक वाहन त्यांच्या विरुद्ध दिशेने येत होते. ते वाहन थेट वसंत मोरे उभे असलेल्या दिशेने भरधाव वेगाने आले. पण वेळीच मोरे यांचा कॅमेरामन आणि स्वत: वसंत मोरे रस्त्याच्या बाजुला धावल्यानं ते अपघातातून थोडक्यात बचावले.
काही दिवसापूर्वी पुण्यातील नवले पुलावर एक भीषण अपघात झाला होता. यात एका ट्रकनं १० ते १२ वाहनांना उडवलं होतं. तर अपघातात एक ट्रकमध्ये अडकलेल्या कारनं पेट घेतला होता. या दुर्घटनेत मोठी जीवितहानी झाली होती. या पुलावर इतका भयानक अपघात होणं हे पहिल्यांदा घडलं नाही. याआधीही देखील या पुलावर किती वेळा मोठे अपघात घडलेत. वारंवार या पुलावर अपघात घडत असल्यानं राजकीय विरोधकांनी आणि तेथील नागरिकांनी तेथील प्रशासनावर टीका केली होती.
तर या पुलावर होणाऱ्या अपघातांवर आळा घालण्यासाठी वाहतुकीचे काही नियम घालून देण्यात आले आहेत दरम्यान त्याच पुलामधील दोषाबाबत शिवसेना नेते वसंत मोरे फेसबूक लाईव्ह करत बोलत होते. त्यावेळी एक उलट्या दिशेने येणारे वाहन आले. व्हिडिओमध्ये दिसत आहे की वाहनधारक वेगाने कार चालवत होता.