गाड्यांचा अक्षरशः चेंदामेंदा, ८ जणांचा होरपळून मृत्यू, नवले पुल दुर्घटनेतील मृतांची नावे समोर
गाड्यांचा अक्षरशः चेंदामेंदा, ८ जणांचा होरपळून मृत्यू, नवले पुल दुर्घटनेतील मृतांची नावे समोर
img
वैष्णवी सांगळे
पुण्यातील नवले पुलावर काल संध्याकाळी साधारण ०५ : ४० वाजता भीषण अपघात झाला. यावेळी रस्त्यावर गाड्यांचा आणि मृतांचा जणू खच पडला होता. यावेळी रस्त्यावर एकच धावाधाव काल संध्याकाळी पहायला मिळाली. या दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू झाला तर १५ जण जखमी झाले आहेत. 



पुणे शहरातील नवले पुलावर काल संध्याकाळी भीषण अपघात झाला. साताराहून पुण्याच्या दिशेने येत असताना नवले पुलावर असलेल्या उतारावर एका भरधाव वेगात आलेल्या कंटेनर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. या कंटेनरने पुढे असलेल्या अनेक गाड्यांना धडक देत एका ट्रकला धडक दिली. यानंतर या धडकेत कंटेनरने अचानक पेट घेतला. या दुर्घटनेत एका चारचाकी मधील कुटुंबाचा मृत्यू झाला.

अपघातात आत्तापर्यंत ८ जणांचा मृत्यू जणांचा मृत्यू झाला, तर १५ जणं जखमी असून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहे. या अपघातातील मृतांची ओळख पटली असून त्यांची नवे समोर आली आहेत. तसेच या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आला आहे.

मृतांची नावे

१) स्वाती संतोष नवलकर (वय ३७, रा. थायरी फाटा)

२) शांता दत्तात्रय दाभाडे (वय ५४)

३) दत्तात्रय चंद्रकांत दाभाडे (वय ५८, दोघे रा. धायरी)

४) मोक्षिता हेमकुमार रेड्डी (वय ३ लक्ष्मी चौक, चिखली)

५) कारचालक धनंजय कुमार कोळी (वय ३० रा. चिखली पुणे, मुळ- जयसिंगपूर, कोल्हापूर)

६) रोहित ज्ञानेश्वर कदम (वय २५ रा. लोणी ता. खंडाळा जि. सातारा)

७) रुस्तम वृद्धार खान (ट्रकचालक) (वय ३५ रा. राजस्थान)

८) मुश्ताक हनीफ खान (क्लिनर) (वय ३१, रा. राजस्थान)

गेल्या आठ वर्षांत या परिसरात २१० हून अधिक अपघात झाले आहेत, तर ८२ निष्पाप लोकांचा मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातात प्रवाशांसह काही स्थानिक नागरिकही मृत्यमुखी पडले आहेत.यावर प्रशासनाने तात्पुरत्या उपाययोजना केल्या मात्र ठोस उपाययोजना करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे म्हटलं जात आहे. जखमींवर सध्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांकडून पाच लाखाची मदत जाहीर करण्यात आली आहे.
Pune |
इतर बातम्या
Join Whatsapp Group