चाललंय काय ? ज्याच्यावर सुरक्षेची जबाबदारी तोही सुरक्षित नाही , किरकोळ कारणातून पोलिसावरच हल्ला
चाललंय काय ? ज्याच्यावर सुरक्षेची जबाबदारी तोही सुरक्षित नाही , किरकोळ कारणातून पोलिसावरच हल्ला
img
वैष्णवी सांगळे
पुणे शहरातील वाढणारी गुन्हेगारी ही सर्वसामान्य नागरिकांसह पोलीसांठीही डोकेदुखी ठरत आहे. खून, दरोडे, अपहरण, महिलांची सुरक्षतेता यासारख्या विविध कारणामुळे शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. असे असताना आता शहरात पोलिसावरच हल्ला झाल्याची घटना घडली आहे.  पुणे गुन्हे शाखेच्या युनिट 3 मध्ये कार्यरत असलेल्या अमोल काटकर या पोलीस अधिकाऱ्यावर शनिवारी मध्यरात्री कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आलाय.  


मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी मध्यरात्री सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास, पुण्यातील गुन्हे शाखेतील अधिकारी अमोल काटकर हे ड्युटी संपवून आपल्या घरी जात होते. त्यावेळी लॉ कॉलेज रोड परिसरात बाईकवरून आलेल्या दोघा अज्ञात व्यक्तींनी अचानक त्यांच्यावर हल्ला केला. आरोपींनी अमोल काटकर यांच्या डोक्यावर कोयत्याने वार केला असून या हल्ल्यात काटकर गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर परिसरात काही वेळ दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस अधिकारी अमोल काटकर यांच्यावर झालेला हा हल्ला गाडीला कट मारल्याच्या वादातून झाला. वाहन चालवताना झालेल्या किरकोळ वादानंतर हल्लेखोरांनी आक्रमक होत कोयत्याने वार केल्याचे सांगितले जात आहे. काटकर यांच्यावर हल्ल्याची माहिती मिळताच जवळील पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले आणि काटकर यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या ते सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान आता प्रकरणात पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.


Pune |
इतर बातम्या
Join Whatsapp Group