१८ जणांना दहशतवादी कनेक्शच्या संशयावरून अटक, ATS आणि पोलिसांची मोठी कारवाई
१८ जणांना दहशतवादी कनेक्शच्या संशयावरून अटक, ATS आणि पोलिसांची मोठी कारवाई
img
वैष्णवी सांगळे
बुधवारी रात्रीपासून गुरुवारी सकाळपर्यंत पुण्यातील कोंढवा परिसरात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक (ATS) आणि पुणे पोलिसांनी संयुक्तपणे छापेमारी केली. पोलिस सूत्रांनुसार, कोंढवा, खडकी, खडक, वानवडी आणि भोसरी यासह पुण्यातील सुमारे 20 ठिकाणी ही शोधमोहीम राबवण्यात आली. दहशतवादी कनेक्शनच्या संशयावरून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.


 या कारवाईत आतापर्यंत किमान १८ जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली आहे. देशविरोधी कृत्यांच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली आहे. या छापेमारीदरम्यान, अनेक संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून, पोलिसांनी महत्त्वाचे पुरावे आणि कागदपत्रे जप्त केली आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, ही कारवाई कोथरूड येथील एका आधीच्या तपासातून मिळालेल्या माहितीच्या आधारे करण्यात आली आहे. या तपासादरम्यान दोन व्यक्तींना अटक करण्यात आली होती, ज्यांचे दहशतवादी कनेक्शन असल्याचे नंतर उघड झाले. त्यांच्या चौकशीतून "पुणे मॉड्यूल" नावाच्या दहशतवादी गटाची माहिती समोर आली, ज्यामुळे ही नवीन कारवाई करण्यात आली.

नुकतीच करण्यात आलेली ही कारवाई 2023 मध्ये पुण्यात उघडकीस आलेल्या ISIS-संबंधित दहशतवादी प्रकरणाशी जोडली गेली आहे. या प्रकरणात मुंबई, पुणे आणि गुजरातमधील काही भागांमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याचा कट रचल्याचा आरोप असलेल्या अनेक व्यक्तींना अटक करण्यात आली होती. तपासात असे समोर आले होते की, आरोपींनी कोल्हापूर आणि सातारा येथील जंगलात बॉम्ब चाचणी घेतली होती आणि कोंढवा परिसरात बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण घेतले होते.
Pune |
इतर बातम्या
Join Whatsapp Group