खळबळजनक ! जिल्हा न्यायालयात तरुणाची आत्महत्या, चौथ्या मजल्यावरून मारली उडी
खळबळजनक ! जिल्हा न्यायालयात तरुणाची आत्महत्या, चौथ्या मजल्यावरून मारली उडी
img
वैष्णवी सांगळे
पुण्यातील जिल्हा न्यायालयामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून तरुणाने आत्महत्या केली आहे. जमिनीच्या व्यवहारातून झालेल्या वादाच्या संदर्भात त्यांची केस पुणे न्यायालयात सुरू होती. केस चालत नाही, न्याय मिळत नाही असा आरोप करत तरुणाने आत्महत्या केलीये. 


पुणे जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीवरून उडी मारून एका पक्षकार असलेल्या या आत्महत्या केली. नामदेव जाधव असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. नामदेव हे पुण्यातील वडकी भागातील राहणारे होते. जमिनीच्या व्यवहारातून झालेल्या वादाच्या संदर्भात त्यांची केस पुणे न्यायालयात सुरू होती. 

गेल्या २७ वर्षांपासून त्यांची केस पुणे न्यायालयात सुरू होती. प्रदीर्घ काळापासून सुरू असलेल्या केसमध्ये न्याय मिळत नसल्याने ते खचुन गेले. अशी प्राथमिक माहिती आहे. आणि शेवटी त्यांनी न्यायालयातच टोकाचं पाऊल उचललं. 

संतप्त झालेल्या पक्षकाराने चौथ्या मजल्यावरून उडी मारली. या घटनेत गंभीर जखमी झालेले नामदेव जाधव यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे न्यायालय परिसरात एकच गोंधळ उडाला. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली.

घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शिवाजीनगर पोलिसांनी तरुणाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. मृत तरुणाची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. शिवाजीनगर पोलिस सध्या तपास करत आहेत.


इतर बातम्या
नाशिक :

Join Whatsapp Group