'ऐसा पती और सास किसी को न मिले', स्टेटस टाकलं अन...
'ऐसा पती और सास किसी को न मिले', स्टेटस टाकलं अन...
img
वैष्णवी सांगळे
गोंदिया शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील गणेशनगर येथे सरिता पराग अग्रवाल (२८) या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी तिने व्हाट्सअँप स्टेटस देखील ठेवले होते ज्यात हृदयद्रावक मजकूर टाकला होता. 

नेमकं प्रकरण काय ? 
सरिता गुप्ता हिचा विवाह ७ जून २०२३ रोजी पराग रमन अग्रवाल (रा. गणेश अपार्टमेंट, गोंदिया) याच्याशी झाला होता. विवाहासाठी गुप्ता परिवाराने सोने-चांदीचे दागिने, तसेच परागची आई श्रद्धा अग्रवाल यांच्या हातात एक लाख रुपये रोख दिले होते. लग्नानंतर सासू श्रद्धा अग्रवाल व नणंद पूर्वा अग्रवाल यांनी घरकाम, वागणूक, पैशांच्या मागणीवरून सरिताचा सतत मानसिक छळ सुरू केला. 

ऑगस्ट २०२४ मध्ये सरिताला मुलगी झाल्यानंतर माहेरून ३१ हजार रुपये, सोन्याचे कडे व चेन आण, म्हणून तिला तगादा लावण्यात आला होता. गुप्ता परिवाराने क्षमतेप्रमाणे अर्धी मागणी पूर्ण केली तरीही तिचा छळ सुरूच राहिला. नणंदेच्या लग्नासाठी एक लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती; ५० हजार रुपये रोख सरिताच्या माहेरच्यांनी दिले होते. सतत पैशांसाठी त्रास होत असल्याने गुप्ता कुटुंबीयांनी सासूच्या खात्यात २० हजार रुपये ऑनलाइन ट्रान्सफर केले होते. मात्र त्यानंतरही सरिताचा सासरच्या मंडळीकडून छळ सुरूच होता असे प्रथमदृष्ट्या दिसते.

सरिताने आपला भाऊ योगेश गुप्ता याला सांगितले होते की, पराग अग्रवाल याचे बाहेरील महिलेबरोबर संबंध आहेत. त्यावरून वारंवार वाद होत असत. यात तिला मारहाण होत असे. हे प्रकरण एकदा भावाने जाऊन मिटविले होते; परंतु वाद सुटला नाही. अखेर ६ डिसेंबर २०२५ रोजी पहाटे १:३० वाजेच्या सुमारास, सासू श्रद्धा अग्रवाल यांनी सरिताच्या माहेरच्या लोकांना फोन केला आणि सरिताच्या मृत्यूची बातमी दिली.

महत्त्वाचे म्हणजे, सरिताने मृत्यूपूर्वी आपल्या सोशल मीडियावरून 'ऐसा पती और सास किसी को ना मिले' अशा आशयाचे स्टेटस टाकले होते. 
इतर बातम्या
नाशिक :

Join Whatsapp Group