मोठी बातमी ! ठाकरे गटाच्या 'या' बड्या नेत्याची आत्महत्या... १० दिवसांपूर्वीच केला होता वाढदिवस साजरा
मोठी बातमी ! ठाकरे गटाच्या 'या' बड्या नेत्याची आत्महत्या... १० दिवसांपूर्वीच केला होता वाढदिवस साजरा
img
वैष्णवी सांगळे
जळगाव जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि जळगाव महापालिकेचे नगरसेवक अनंत जोशी यांनी आत्महत्या केली आहे. ओंकारेश्ववर मंदिर परिसरात असलेल्या राहत्या घरात त्यांनी गळफास घेऊन आयुष्य संपवलं आहे. 

याची माहिती नातेवाईकांना समजताच त्यांनी अनंत जोशी यांना तात्काळ रूग्णालयात नेलं. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. आत्महत्येचं कारण अस्पष्ट असून, त्यांनी आयुष्य का संपवलं? याचा तपास सुरू आहे.अनंत जोशी हे जळगाव महापालिकेत शिवसेना गटाचे नगरसेवक यासह महापालिकेचे गटनेतेही होते. 

हे ही वाचा... 
रोहिणी खडसेंची पतीला वाचवण्यासाठी धडपड, 'या' मोठ्या नेत्याच्या भेटीला

१० दिवसांपूर्वी त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला होता. त्यानंतर त्यांनी राहत्या घरात टोकाचा निर्णय घेतला. त्यांच्या आत्महत्येची माहिती मिळताच शिवसेना ठाकरे गटातील नेत्यांसह विविध पक्षातील नेत्यांनी, पदाधिकांऱ्यांनी रूग्णालयात जाऊन कुटुंबियांचं सांत्वन केलं.
इतर बातम्या
Join Whatsapp Group