धक्कादायक ! आई म्हणाली अभ्यास कर , रागाच्या भरात मुलीने मात्र भलतंच केलं
धक्कादायक ! आई म्हणाली अभ्यास कर , रागाच्या भरात मुलीने मात्र भलतंच केलं
img
वैष्णवी सांगळे
छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अभ्यास कर आई फक्त एवढंच म्हणाली मात्र याच गोष्टीचा राग मनात धरून एका १८ वर्षीय नर्सिंगच्या विद्यार्थिनीनं धक्कादायक पाऊल उचललं आहे. अगदी लहान कारणामुळे विद्यार्थिनीनं गळफास घेऊन आयुष्य संपवलंय. ही घटना रविवारी उघडकीस आली.
.
विशाखा अनिल वक्ते असे मृत तरूणीचे नाव आहे. ती छत्रपती संभाजीनगरमधील वडगाव कोल्हाटी भागात रहिवासी आहे. विशाखा नर्सिंगच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होती. तर, तिचे वडील एका कंपनीत काम करतात. घटनेच्या दिवशी सायंकाळच्या सुमारास विशाखा टिव्ही पाहत होती.

BMW कारच्या धडकेत अर्थ मंत्रालयातील उपसचिवाचा मृत्यू, पत्नीचे गंभीर आरोप

त्यावेळेस विशाखाची आई किचनमधून बाहेर आली. नंतर विशाखाला अभ्यास करण्यास सांगितले. नंतर विशाखाची आई किचनमध्ये गेली. त्यावेळी विशाखाचा लहान भाऊ दुसऱ्या खोलीत अभ्यास करत होता. विशाखाला आईच्या बोलण्याचा राग आला. राग मनात धरून विशाखा तिसऱ्या मजल्यावर गेली.

घरातील तिसऱ्या मजल्यावरील पायऱ्यांवर तिनं गळफास लावून आत्महत्या केली. विशाखाला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहून आईला धक्का बसला. तिनं तातडीने शेजाऱ्यांना बोलावून घेतलं. तसेच विशाखाला बेशुद्धावस्थेत घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून विशाखाला मृत घोषित केले. 


इतर बातम्या
Join Whatsapp Group