आई-वडील अन् ३ मुलांची आत्महत्या, भिंतीवर लिहिले आत्महत्येचे खळबळजनक कारण
आई-वडील अन् ३ मुलांची आत्महत्या, भिंतीवर लिहिले आत्महत्येचे खळबळजनक कारण
img
वैष्णवी सांगळे
उत्तर प्रदेशच्या मथुरामध्ये एकाच कुटुंबातील ५ जणांनी सामूहिक आत्महत्या केलीय. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मथुरातील खपरपुर गावातील एका कुटुंबात नवरा-बायको आणि तीन मुलांचे मृतदेह घरामध्ये आढळून आले. धक्कादायक म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी भिंतीवर सुसाईड नोट लिहिली आणि व्हिडीओ देखील काढले होते.

प्राथमिक माहितीनुसार, मथुरातील खपरपुर गावात ही घटना घडली. मुकेश, त्याची बायको आणि ३ मुलं एकाच खोलीमध्ये मृतावस्थेत आढळून आले. शेजारीच मुकेशचा भाऊ राहतो. त्याने सकाळी घराचा दरवाजा ठोठावला पण कुणीच काहीच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्याने दरवाजा तोडल्यानंतर आतमध्ये पाचही जणांचे मृतदेह आढळून आले.

त्यानंतर त्याने पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पाचही जणांचे मृतदेह ताब्यात घेत त्यांनी शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. पोलिसांना घटनास्थळी भिंतीवर आणि एका वहिमध्ये लिहिलेली सुसाइड नोट सापडली. त्याचसोबत आत्महत्या केलेल्या मुकेशच्या मोबाइलमध्ये आत्महत्यापूर्वी तयार केलेला व्हिडीओ देखील सापडला. 

आम्ही आमच्या स्वइच्छेने आत्महत्या करत आहोत असा मजकूर भिंतीवर लिहिलेला होता. मुकेश आणि त्याच्या बायकोने दूधातून विष मिक्स केले आणि हे दूध सर्वजण प्यायले. या घटनेत पाचही जणांचा मृत्यू झाला.मुकेशचे कुटुंबीय आर्थिक अडचणीत होते का ? की आत्महत्येमागे आणखी काही कारण आहे ? याचा तपास पोलिस करत आहेत. 
इतर बातम्या
नाशिक :

Join Whatsapp Group