वंशाला दिवा हवा या एका कारणासाठी आज देखील अनेक महिलांचा आणि जन्माला आलेल्या कोवळ्या लेकीला छळण्याचा प्रकार सुरूच आहे. मुलगा होणार की मुलगी हे स्त्रीवर नाही तर पुरुषावर अवलंबून असते हे मान्य करायला आजही अनेक जण तयार नाहीत आणि ज्यामुळे महिलांचा छळ सुरूच आहे. अनेक जण असे आहेत, जे मुलीला लक्ष्मी मानतात, पण दुसरीकडे समाजातील काही लोक वंशाला दिवा हवा या भूरसट विचारातून अद्यापही बाहेर पडलेले नाही.
उत्तर प्रदेशच्या बिजनौर जिल्ह्यात महिला आणि तिच्या कोवळ्या लेकीसोबत माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुलीच्या जन्मानंतर निराश झालेल्या सासरच्या मंडळींनी महिलेला मारहाण केली आणि नुकताच जन्मलेल्या मुलीसोबत तिला हॉस्पिटलच्या बाहेर काढलं. या कारणास्तव हॉस्पिटल परिसरात बराच वेळ गोंधळ सुरु होता
मिळालेल्या माहितीनुसार, मुंतरीन नावाच्या महिलेचं लग्न वसीम नावाच्या एका व्यक्तीसोबत 11 महिन्यांपूर्वी झालेलं. सात दिवसांपूर्वी मुंतरीन हिने एका खासगी रुग्णालयात एका मुलीला जन्म दिला… आरोप असे आहेत की, वसीम आणि त्याच्या कुटुंबियांना मुलगा होईल अशी अपेक्षा होती. पण मुलगा झाल्यामुळे मंतरीन हिच्या सासरचे नाराज होते.
सोमवारी म्हणजे 23 मार्च रोजी मुंतरीन टाके काढण्यासाठी रुग्णालयात पोहोचली… तेव्हा तिचे आई – वडील देखील तिच्यासोबत होतो. हॉस्पिटलचं बिल भरण्यासाठी मुंतरीन हिचे हिचे आई – वडील आले. याच दरम्यान, नवरा वसीम आणि त्याच्या कुटुंबियांनी मुलगी झाली म्हणून, मुंतरीन हिला टोमना मारला, तेव्हा मुंतरिन हिने काही दिवसांसाठी माहेरी जाते असं सासरच्या मंडळींना विचारलं. अशात संतापलेल्या वसीम आणि त्याच्या भावांनी महिलेला मारलं आणि चिमुकलीसोबत बाहेर जाण्यास सांगितलं.
संतापलेल्या वसीम आणि त्याच्या कुटुंबियांनी फक्त मुंतरीन हिलाच नाहीतर, तिचा बचाव करण्यासाठी आलेल्या तिच्या आई – वडिलांना देखील मारहाण केली… हॉस्पिटलबाहेर, पीडितेच्या कुटुंबीयांनी न्यायाची मागणी केली आणि बराच वेळ गोंधळ सुरू होता. बघ्यांनी आणि वाटसरूंनी हस्तक्षेप करून परिस्थिती शांत केली. घटनेची माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपी वसीम व इतरांना ताब्यात घेतलं.
पीडित मुंतारिनने दिलेल्या माहितीनुसार, तिला मुलगी झाल्यामुळे तिच्या सासू, सासरे, दीर, नणंद आणि मेहुण्याने तिला फटकारले. एवढंच नाही तर, मुलीला तीन लाखात विक असं दीर म्हणाला… पोलिसांनी देखील याप्रकरणी वक्तव्य केलं आहे, ‘सूनेला शिवीगाळ, मारहाण आणि तिच्यावर अत्याचार करण्यात आले आहेत. संपूर्ण चौकशी केल्यानंतर पुढील कारवाई करू…’ असं पोलीस म्हणाले आहे.