मन सून्न करणारी घटना : बसने अचानक पेट घेतला, आपत्कालीन दरवाजाने घात केला; 2 मुलांसह 5 जणांचा मृत्यू
मन सून्न करणारी घटना : बसने अचानक पेट घेतला, आपत्कालीन दरवाजाने घात केला; 2 मुलांसह 5 जणांचा मृत्यू
img
Dipali Ghadwaje
उत्तर प्रदेशच्या लखनौमध्ये  मन सून्न करणारी घटना घडली आहे. धावत्या बसला लागलेल्या आगीत 2 लहानग्यांसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे.  बस बिहारहून दिल्लीला जात होती. मात्र अचानक लखनौमध्ये या बसला आग लागली. बसमध्ये 80  प्रवाशी प्रवास करत होत.  


याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,  गुरुवारी पहाटे 5 वाजता ही घटना घडली. बसला आग लागल्यानंतर बसमध्ये धापवळ सुरु झाली. बसमध्ये प्रवाशी जास्त असल्याने सर्वांना बाहेर पडायला वेळ लागला. बसचा आपत्कालीन दरवाजा उघडला नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बसच्या मागच्या भागात असलेले अनेकजण बसमध्येच अडकून पडले. 
 
आगीने काही वेळातचं रौद्र रुप धारण केले. क्षणात बस आगीच्या भक्ष्यस्थानी गेली. त्यामुळे वेळेवर बसमधून बाहेर पडू न शकल्याने दोन लहान मुलांसह पाच प्रवाशांचा यात होरपळून मृत्यू झाला. 

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि आग आटोक्यात आणण्यात आली. पोलिसांनी सांगितले की, सुरुवातीच्या तपासात बसचा आपत्कालीन दरवाजा उघडला नसल्याचे समोर आले आहे.  

बसला आग नेमकी कशी लागली याचे कारण अजून समजले नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बसमध्ये प्रत्येकी पाच किलोचे सात गॅस सिलिंडर होते. मात्र एकाही सिलिंडरचा स्फोट झाला नाही. त्यामुळे सिलेंडर आगीचं कारण नाही, हे स्पष्ट झालं आहे.  तपासानंतर आगीचं नेमकं कारण काय होते हे समोर येईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group