धक्कादायक! दाजीसोबत बोलण्यास विरोध केल्याने पत्नीने पतीसोबत केले भयंकर कृत्य
धक्कादायक! दाजीसोबत बोलण्यास विरोध केल्याने पत्नीने पतीसोबत केले भयंकर कृत्य
img
Dipali Ghadwaje
रागाच्या भरात बायकोने नवऱ्याचे गुप्तांग कापल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली. उत्तर प्रदेशच्या असमोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका गावात ही घटना घडली. या घटनेमुळे उत्तर प्रदेशमध्ये खळबळ उडाली.


नेमकं काय प्रकरण?

जिजूसोबत फोनवर बोलू दिलं नाही त्यामुळे बायको संतापली. नवरा-बायकोमध्ये यावरून कडाक्याचे भांडण झालं. त्यानंतर रागाच्या भरात बायकोने नवऱ्याचे गुप्तांग कापलं.  बचावासाठी या महिलेचा नवरा जोरजोरात ओरडू लागला. त्यावेळी शेजारी राहणाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत बायकोच्या तावडीतून नवऱ्याची सुटका केली.

त्यानंतर महिलेने अॅसिड प्यायले. दोघांनाही गंभीर अवस्थेमध्ये मुरादाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी महिलेच्या नवऱ्याने आरोप केला की, माझी बायको मला जीवे मारणार होती पण शेजाऱ्यांनी मला वाचवले. हल्ला झाल्यानंतर माझ्या कुटुंबीयांनी आणि गावातील नागरिकांनी माझ्या बायकोच्या कुटुंबीयांना फोन करून तिने केलेल्या धक्कादायक कृत्याबद्दल सांगितले.

पीडित व्यक्तीने पुढे असे देखील सांगितले की, 'शेजाऱ्यांनी माझ्या ओरडण्याचा आवाज ऐकला त्यामुळे ते मला वाचवण्यासाठी आले. नाही तर त्या दिवशी माझ्या बायकोने माझी हत्या केली असती. कारण तिच्या हातामध्ये चाकू होता. या चाकूनेच तिने माझा प्रायव्हेट पार्ट कापला. माझ्या पायाला तिने चावा घेतला. त्यानंतर मी बेशुद्ध पडलो.'

या घटनेनंतर पीडित व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबीयांनी बायकोविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तर दुसरीकडे महिलेच्या कुटुंबीयांनी तिच्या सासरच्या व्यक्तींवर गंभीर आरोप केले आहेत.

महिलेच्या भावाने आरोप केला आहे की, नवऱ्यासह ६ जणांनी हुंड्यासाठी माझ्या बहिणीचा छळ केला आणि तिला मारहाण केली. त्यामुळेच माझ्या बहिणीने अॅसिड प्यायले. सध्या पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून घेतला असून तपास सुरू केला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group