दहावीत ९७ टक्के, टॉपर मुलगा पण ट्रेनसमोर उडी घेत आयुष्य संपवले, कारण...
दहावीत ९७ टक्के, टॉपर मुलगा पण ट्रेनसमोर उडी घेत आयुष्य संपवले, कारण...
img
वैष्णवी सांगळे
हुशार आहे , नेहमी वर्गात पहिला नंबर येतो , याला काय टेन्शन असणार असा विचार टॉपरला बघून अनेकदा काहींच्या मनात येतो. पण मनात असलेला त्रास जर कोणाला सहज, न सांगता समजला असता तर ? तर नक्कीच अनेक आत्महत्या थांबल्या असत्या. 

रौनक पाठक , असाच हुशार विद्यार्थी. दहावीमध्ये ९७ टक्के मार्क्स घेणारा टॉपर रौनक याने आत्महत्या करून आपले आयुष्य संपवले. रौनक याची रविवारी प्री-बोर्ड परीक्षा होती. पेपर चांगला गेला होता. सोमवारी तो सकाळी घरातून निघाला. त्याने ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली. सायकल घेऊन तो घराबाहेर गेला अन् काही वेळातच ही घटना घडली. मुलाचा मृतदेह पाहून कुटुंबियांना धक्का बसला. उत्तर प्रदेशातील कानपूरमधील जुही यार्डजवळ सोमवारी सकाळी ही घटना घडली. 

रौनक पाठक हा ब्रिज किशोरी देवी मेमोरियल स्कूलमध्ये शिकला होता. तो शाळत आणि शहरातील टॉपर होता. दहावीला त्याला ९७ टक्के गुण मिळवले होते. रौनक शांत स्वभावाचा होता आणि तो नेहमीच अभ्यासात व्यस्त असायचा. यश मिळवण्यासाठी तो दिवसरात्र अभ्यासच करायचा, असे शेजारच्यांनी सांगितले.

रौनक पाठक याने आत्महत्या का केली? याचं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक माहितीनुसार, शैक्षणिक दबावामुळे रौनक पाठक याने टोकाचे पाऊल उचलले. पोलिसांकडून मुलाचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group