दिवसेंदिवस अन्नपदार्थांत भेसळीचं प्रमाण वाढत आहे. पदार्थांमध्ये प्राण्यांचे अवयव सापडल्याच्या घटनादेखील घडत आहेत. दिल्ली एनसीआरमध्ये अशाच प्रकारची घटना घडली. एका व्यक्तीनं मिठाईच्या दुकानातून समोसे खरेदी केले; पण समोशात बेडकाचा पाय सापडल्याने संबंधित व्यक्तीनं विक्रेत्याशी वाद घातला. तसंच या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला. उत्तर प्रदेशच्या गाजियाबादमध्ये ही घटना घडली आहे.
गाझियाबादच्या इंदिरापुरमच्या अभय खंड याठिकाणी असलेल्या बिकानेर या मिठाईच्या दुकानातला हा व्हायरल व्हिडीओ आहे. एका व्यक्तीने बिकानेर स्वीट्स होममधून समोसा खायला घेतला होता. हा समोसा खात असताना या व्यक्तीला त्यामध्ये बेडकाचा पाय दिसून आला. त्याने तात्काळ याचा व्हिडीओ तयार करून बिकानेर स्वीट्स होममध्ये जाऊन जोरदार राडा घातला.
व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत असलेली व्यक्ती अमन शर्मा आहे. ते न्याय खंड भागातील रहिवासी आहे. अमन आपल्या काही मित्रांसोबत अभय खंड येथील बिकानेर या मिठाईच्या दुकानात समोसे खाण्यासाठी गेला होता. यावेळी त्याने आपल्या मित्रांसोबत काही समोसे खाण्यासाठी घेतले. समोसा खाण्यासाठी घेतला असता त्याला मोठा धक्का बसला. कारण या समोस्यात बेडकाचा पाय होता.
त्यानंतर तो तसाच समोरा घेऊन बिकानेरच्या दुकानात पोहोचला आणि तिथे त्याने गोंधळ घातला. यावेळी दुकानामध्ये नागरिकांनी मोठी गर्दी केली. अमनने जाब विचारला पण दुकान मालकाकडे काहीच उत्तर नव्हते. दरम्यान दुकानामध्ये गोंधळ सुरू असताना १०० नंबरवर कॉल करून पोलिसांना तक्रार करण्यात आली.
त्यावेळी दुकान मालक हे सर्व चुकून झाले असल्याचे बोलू लागला. तेव्हा अमनने दुकान मालकाला जाब विचारला की, 'माझ्या समोस्यामध्ये जर बेडकाचा पाय आहे तर संपूर्ण मसल्यामध्ये बेडूक पडला असावा. हा समोसा तू खाणार आहेस का?' पोलिस येईपर्यंत याठिकाणावर राडा सुरूच होता. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी नवी मुंबईतल्या बेलापूरमध्ये असलेल्या बिकानेरच्या दुकानामधील समोस्यामध्ये झुरळ आढळले होते. त्यावेळी देखील जोरदार राडा झाला होता.