३० जानेवारी रोजी महाकुंभाच्या सेक्टर २२ मधील अनेक तंबूंना आग लागल्याची घटना घडली. या आगीत १५ तंबू जळून खाक झाले होते. अशातच उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यामध्ये पुन्हा आग लागल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , सेक्टर १८ मधील शंकराचार्य मार्गावरील हरिहरानंद कॅम्पमध्ये ही आग लागली. महाकुंभ मेळ्यामध्ये पुन्हा आग लागल्याची घटना घडल्यामुळे घटनास्थळावर गोंधळाचे वातावरण आहे.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. आग लागण्यामागचे कारण अद्याप समोर आले नाही.