हाथरस दुर्घटना : १२१ जणांचा मृत्यू , दुर्घटनेनंतर भोले बाबा फरार ; आयोजकांवर गुन्हा
हाथरस दुर्घटना : १२१ जणांचा मृत्यू , दुर्घटनेनंतर भोले बाबा फरार ; आयोजकांवर गुन्हा
img
Dipali Ghadwaje
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात एका सत्संगादरम्यान मोठी दुर्घटना घडली. या ठिकाणी चेंगराचेंगरीत आत्तापर्यंत 121 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.  या घटनेनंतर जवळील रुग्णाबाहेर मृतदेहांचा खच पडला आहे. तर मृतांच्या जवळच्या नातेवाईकांचा आक्रोश सुरु आहे. या घटनेनंतर पोलिसांनी मोठी कारवाई सुरु केली आहे. 

याप्रकरणी पोलिसांनी २२ आयोजकांवर गुन्हा नोंदवला आहे. तर भोले बाबा फरार असल्याची माहिती मिळत आहे. हाथरस दुर्घटनेप्रकरणी मध्यरात्री उशिरा पोलिसांनी कार्यक्रमाच्या आयोजकांवर गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी आतापर्यंत कार्यक्रमाच्या २२ आयोजकांवर गुन्हा नोंदवला आहे. दुर्घटना घडल्यानंतर भोले बाबा उर्फ सुरजपाल फरार झाल्याची माहिती मिळत आहे.

पोलिसांच्या दिलेल्या माहितीनुसार, ८० हजार लोकांची परवानगी आयोजकांनी घेतली होती. मात्र या कार्यक्रमाला अडीच लाखापेक्षा अधिक लोक जमा झाले होते. पोलिसांनी बाबाच्या मैनपुरी येथील आश्रमाची तपासणी सुरू केली आहे. या आश्रमाच्या आसपास मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

हाथरस दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला

हाथरस दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला आहे. हाथरस दुर्घटनेतील मृतांची संख्या 121 वर पोहोचली आहे. आणखी 28 पेक्षा अधिक लोक जखमी आहेत. या जखमींवर उपचार सुरू आहेत. अनेकांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. हाथरस घटनेवरून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल हाथरस घटनेवरून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.

या प्रकरणी वकील विशाल तिवारी यांनी याचिका दाखल केली आहे. सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली एसआयटी तयार करून तपास करावा, अशी याचिकेतून मागणी केली आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी सगळ्या राज्यांना निर्देश दिले जावेत, असेही याचिकेत म्हटलं आहे.


इतर बातम्या
Join Whatsapp Group