मुलीच्या कृत्याने आई-वडिलांची  मान खाली; नवरदेवाच्या गळ्यात वरमाळा घातली, अन पुढे नवरीने जे केलं ते धक्कादायक होतं
मुलीच्या कृत्याने आई-वडिलांची मान खाली; नवरदेवाच्या गळ्यात वरमाळा घातली, अन पुढे नवरीने जे केलं ते धक्कादायक होतं
img
वैष्णवी सांगळे
यूपीच्या उन्नावमध्ये जे घडलं ते कोणासोबत होऊ नये कारण लग्नाच्या दिवशी जे घडलं ते धक्कादायक होत. यूपीच्या उन्नावमधील अजयपूर गावातील घटना सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे. 

नेमकं काय घडलं ?
अजयपूर येथे राहणाऱ्या एका व्यक्तीच्या मुलीचं 29 नोव्हेंबरला लग्न होतं. गावात वरात आली. वरात आल्यानंतर वधू पक्षाने विधिवत वऱ्हाडी मंडळींच स्वागत केलं. वरमाळेचा कार्यक्रम झाला. यात नवरी मुलीने नवरदेवाच्या गळ्यात हार देखील घातला. पण त्यानंतर सात फेरे घेण्याआधी जे घडलं, ते सर्वांसाठी धक्कादायक होतं. वरात नवरी मुलीशिवाय परत गेली. कारण नवरी मुलगी सात फेरे घेण्याआधीच तिच्या प्रियकरासोबत पळून गेली.  

वरमाळेचा कार्यक्रम झाल्यानंतर नवरी तिच्या खोलीत गेली. त्यानंतर तिला मंडपात यायचं होतं. 7 फेरे घेण्यासाठी नवरीचा शोध घेतला. त्यावेळी ती तिच्या खोलीत नव्हती. नातेवाईकांनी सगळ्या घरात शोधलं. पण नवरीचा शोध लागला नाही. नवरी गायब झाल्याच समजल्यानंतर वधू आणि वर पक्ष दोघांना धक्का बसला.

वडिलांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, मुलीचे गावात राहणाऱ्या एका युवकासोबत प्रेमसंबंध होते. ते म्हणाले की, माझ्या मुलीचं लग्न ठरलं. कार्यक्रमानुसार वरात ठरलेल्या वेळी आली. वरमाळेचा कार्यक्रम संपन्न झाला. पण मुलगी त्यानंतर तिच्या प्रियकरासोबत फरार झाली. अन आनंद दु:खामध्ये बदलला.

दोन्ही बाजूंसाठी हा धक्का होता. वरपक्ष वधूशिवाय परतला. नवरीच्या वडिलांनी प्रियकराविरुद्ध पोलिसात तक्रार दिली आहे. हास्य, विनोदाचं वातावरण शोक सागरात बुडालं. पोलीस स्टेशनचे प्रमुख अमरनाथ यादव यांच्यानुसार युवतीच्या वयाची 18 वर्ष पूर्ण आहेत. प्रकरणाचा तपास सुरु आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group