क्रूरतेचा कळस! नराधमाने आधी ११ वर्षीय मुलीवर बलात्कार केला अन् चेहरा विद्रूप करून जळती सिगारेट....
क्रूरतेचा कळस! नराधमाने आधी ११ वर्षीय मुलीवर बलात्कार केला अन् चेहरा विद्रूप करून जळती सिगारेट....
img
Dipali Ghadwaje
उत्तर प्रदेशच्या रामपूरमध्ये ११ वर्षीय मूक बधीर मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. शेतामध्ये रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्धावस्थेत पडलेली ही मुलगी आढळली. या घटनेमुळे रामपूरमध्ये खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार , या मुलीसोबत आरोपीने जे काही कृत्य केले आहे त्याला क्रूरता किंवा हैवान म्हणणं देखील कमी ठरेल. या मुलीचे आरोपीने खूपच हालहाल केले. सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक आहे.

रामपूरमध्ये एका शेतकऱ्याच्या मूक बधीर मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली. मंगळवारी संध्याकाळपासून पीडित मुलगी बेपत्ता होती. बुधवारी सकाळी शेतात ही मुलगी बेशुद्ध अवस्थेत आढळली. तिला नग्न करून तिच्या शरीराचे हालहाल करून तिला शेतामध्येच टाकण्यात आले होते. तिचे रक्ताने माखलेले कपडे जवळच पडले होते. गावकऱ्यांनी तात्काळ तिला रुग्णालयात दाखल केले.

आधी रामपूरमध्ये तिला उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण तिची प्रकृती खूपच गंभीर होती. प्रकृती सुधारली नाही म्हणून तिला मुरादाबादला हलवण्यात आले. तिथून तिला मेरठला पाठवण्यात आले.

आरोपीनी बलात्कार करताना या मुलीच्या शरीरावर १७ ठिकाणी चावा घेतला. तिच्या गुप्तांगाला सिंगारेटचे चटके दिले ऐवढंच नाही तर तिच्या गुप्तांगात जळती सिगारेट टाकली. या मुलीला आरोपीने बेदम मारहाण देखील केली.

यामुळे तिच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा होत्या. तिचा चेहरा देखील मारून मारून आरोपीने विद्रूप केला. ऐवढ्या वेदना देत आरोपीने तिला शेतात टाकूनच पळ काढला.

पीडित मुलीच्या वडिलांनी सांगितले की, मुलगी अनेकदा घराबाहेर पडायची. पण संध्याकाळी उशिरा परतायची. मंगळवारी संध्याकाळी ६ वाजता ती घरातून निघाली. रात्री उशिरापर्यंत ती परत आली नाही तेव्हा मला काळजी वाटली. आम्ही गावात तिचा शोध घेतला. तिच्या बेपत्ता होण्याचे वृत्त लाऊडस्पीकरवरून देण्यात आले. गाकवकऱ्यांसोबत तिला सगळीकडे शोधले पण ती सापडली नाही. गावानजीकच्या शेतात ती सकाळी बेशुद्धावस्थेत सापडली.

या घटनेमुळे रामपूरमध्ये खळबळ उडाली असून गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस तपास करत आहे. आरोपी फरार असून पोलिस शोध घेत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group