धक्कादायक ! ८ मैत्रिणी भंडारा खाऊन घरी निघाल्या पण वाटेत नको ते घडलं, ४ मुलींचा जागीच मृत्यू
धक्कादायक ! ८ मैत्रिणी भंडारा खाऊन घरी निघाल्या पण वाटेत नको ते घडलं, ४ मुलींचा जागीच मृत्यू
img
वैष्णवी सांगळे
उत्तर प्रदेशातील रायबरेली जिल्ह्यातील गंगा एक्सप्रेसवेवर सुलतानपूर जनौली येथे एक भीषण अपघात झाला आहे  भंडाऱ्यात जेवण केल्यानंतर ८ मैत्रिणी चालत घरी निघाल्या होत्या. पण याच वेळी काळ बनून आलेल्या कारने या सर्व मैत्रिणींना चिरडलं. या अपघातात ४ मुलींचा जागीच मृत्यू झाला आहे तर इतर ४ मुलींची प्रकृती गंभीर आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, कोडेर गावातील अनेक लोक चुली गावात भंडाऱ्यासाठी गेले होते. भंडारा झाल्यानंतर ८ मुली चालत घराकडे येत होत्या. त्यावेळी काळाने घाला घातला अन् क्षणात होत्याचं नव्हते झाले. या ८ मुलींना एका भरधाव कारने चिरडल्याची माहिती मिळताच कोडेर गावात खळबळ उडाली. संतप्त गावकऱ्यांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. पण तोपर्यंत चालक घटनास्थळावरून पसार झाला होता. गावकऱ्यांनी पोलिसांना तात्काळ याबाबत माहिती दिली. पोलिसांनी पंचनामा करत कार चालकावर गुन्हा दाखल केला आहे. जखमींना जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

पोलिस अधीक्षकांनी सांगितले की, काम सुरू असलेल्या गंगा एक्सप्रेसवेवर वेगाने येणाऱ्या कारमुळे हा अपघात झाला. यात चार मुलींचा मृत्यू झाला आहे आणि चार जण जखमी झाल्या आहेत. वाहन ताब्यात घेण्यात आले आहे. चालकाचा शोध घेण्यात येत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group