महाकुंभात पवित्र स्नान करून परतताना काळाचा घाला, भीषण अपघातात  बाप-लेकीचा मृत्यू , १० गंभीर
महाकुंभात पवित्र स्नान करून परतताना काळाचा घाला, भीषण अपघातात बाप-लेकीचा मृत्यू , १० गंभीर
img
Dipali Ghadwaje
प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभात पवित्र स्नान करून परतणाऱ्या भक्तांवर काळाने घाला घातलाय. भाविकांच्या जीपने बसला जोरदार धडक दिल्यामुळे भीषण अपघात झालाय. यामध्ये बाप-लेकीचा जागीच मृत्यू झाला, तर १० जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर महामार्गावर खळबळ उडाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार , यामधील काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. कानपूर-लखनौ महामार्गावर अजगैन परिसरात आज सकाळी साडेसहा वाजता हा अपघात झाला.

कानपूर-लखनौ महामार्गावर अजगैन परिसरात आज सकाळी जीप आणि बसचा भीषण अपघात झाला. भाविक महाकुंभात पवित्र स्नान करून घराकडे परत निघाले होते, त्यावेळी काळाने घाला घातला. या भीषण अपघातामध्ये बाप-लेकीचा जागीच मृत्यू झाला. तर १० जण गंभीर जखमी झाले. 

घटनास्थळी अर्ध्या तासानंतर पोलीस पोहचले, त्यानंतर जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी तात्काळ जीपमध्ये अडकेलल्या भाविकांना बाहेर काढले अन् रूग्णालयात दाखल केले. चालकाला गाडी चालवाताना डोळा लागल्यामुळे अपघात झाला असेल, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय.

मध्य प्रदेशमधील ईशागड आणि शिवपूरी येथील १२ भाविक मार्शल जीपमधून एक जानेवारी रोजी महाकुंभात पोहचले होते. महाकुंभामध्ये पवित्र स्नान, इतर विधी केल्यानंतर आज ते निघाले होते. महाकुंभानंतर ते काशी विश्वनाथ आणि अयोध्यामध्ये राम लल्लाचे दर्शन करून चित्रकूटला परतणार होते. पण अजगैनजवळ चमरौली गावाजवळ काळाने घाला घातला. जीपला बसने जोरदार धडक दिली. 

यामध्ये ५५ वर्षीय सुरेश तिवारी आणि त्यांची ३० वर्षीय मुलगी राधा व्यास यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामध्ये दहा जण जखमी झाले आहेत. सर्वांना जवळच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेय. यामधील काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येतेय.  
इतर बातम्या
Join Whatsapp Group