उत्तर प्रदेशमधील हापूर येथून एक अजब घटना समोर आली आली आहे. हापूर येथील देव नंदिनी रुग्णालयात डॉक्टरांनी ऑपरेशनवेळी तरुणाच्या पोटातून एक दोन नव्हे तर तब्बल २९ स्टीलचे चमचे आणि १९ टूथब्रश काढण्यात आले. या प्रकारची चर्चा आता सर्वदूर पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सचिनला ड्रग्सचे व्यसन होते.ज्या तरुणाच्या पोटातून डॉक्टरांनी या सर्व गोष्टी ऑपरेशनमधून बाहेर काढल्या, त्या तरुणाचे नाव सचिन असे आहे. या व्यसनामुळे त्याच्या कुटुंबाला त्रास सहन करावा लागत असे. कुटुंबियांनी सचिनला एका व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केले. रागाच्या भरात सचिनने व्यसनमुक्ती केंद्रातील स्टीलचे चमचे, टूथब्रश गिळायला सुरुवात केली.
व्यसनमुक्ती केंद्रात मिळणाऱ्या मर्यादित जेवणामुळे सचिनला त्रास होत असे. हळूहळू त्याच्या पोटात तीव्र वेदना व्हायला सुरुवात झाली. वेदना असह्य झाल्याने तो डॉक्टरांकडे गेला. तपासणीदरम्यान, डॉक्टरांना सचिनच्या पोटात मोठ्या प्रमाणात धातूसारख्या वस्तू आढळल्या.
देव नंदिनी रुग्णालयाचे डॉ. श्याम कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णाला जेव्हा आणले तेव्हा त्याच्या कुटुंबियांनी सांगितले की तो व्यसनमुक्ती केंद्रात चमचे आणि टूथब्रश खात असे. तपासणीनंतर आम्ही ताबडतोब शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. डॉक्टरांच्या एका पथकाने ऑपरेशन केले आणि सचिनच्या पोटातून २९ स्टीलचे चमचे, १९ टूथब्रश काढले.
या प्रकारची समस्या अनेकदा मानसिक समस्या असलेल्या लोकांमध्ये दिसून येते. वेळेवर ऑपरेशन केल्याने रुग्णाचे प्राण वाचले. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे आणि तो वैद्यकीय देखरेखीखाली आहे.