मध्यरात्री गाढ झोपेत असलेल्या कुटुंबावर काळाचा घाला ; भीषण अपघातात कुटुंबातील तिघांचा मृत्यू ; कुठे घडली घटना ?
मध्यरात्री गाढ झोपेत असलेल्या कुटुंबावर काळाचा घाला ; भीषण अपघातात कुटुंबातील तिघांचा मृत्यू ; कुठे घडली घटना ?
img
Dipali Ghadwaje
उत्तर प्रदेशच्या गाझीपूरमध्ये झोपडीत भरधाव ट्रेलर घुसल्याची घटना घडली. भरधाव ट्रेलर मध्यरात्री अनियंत्रित होऊन झोपडीत घुसला. या भीषण अपघातात एका कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. तर त्याच कुटुंबातील एक महिला गंभीर जखमी झाली आहे.

मिळलेल्या माहितीनुसार , गाझीपूरच्या माँ कामाख्या धामजवळी रस्त्याजवळ असलेल्या झोपडीत ट्रेलर घुसला. अनियंत्रित ट्रेलर झोपडीत घुसल्याने एकच खळबळ उडाली.

ट्रेलर गाझीपूरहून बिहारला निघाला होता. बिहारला जाताना भरधाव ट्रेलरने रस्त्याच्या जवळील झोपडीतील कुटुंबाला चिरडलं. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तीन लहान मुलांचा मृत्यू झाला. तर एकाची प्रकृती गंभीर असल्याचं बोललं जात आहे.

लालजी जोम यांचं कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून झोपडीत राहत आहे. कुटुंबातील सदस्य नेहमी सारखे जेवण करून झोपी गेलं. त्यानंतर मध्यरात्री अनियंत्रित ट्रेलरने झोपडीत गाढ झोपी गेलेल्या कुटुंबाला चिरडलं.

अपघातात लालजी डोम यांची ५ वर्षांची मुलगी कबूतरी, २ वर्षीय मुलगा ज्वाला आणि ७ वर्षीय मुलगी सपना या तिघांचा मृत्यू झाला.

अपघातात लालजी यांची ३० वर्षीय पत्नी संतरा देवी आणि एक मुलगी गंभीर जखमी झाली आहे. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केलं.

लालजी डोम बाहेर गेले होते. त्यामुळे थोडक्यात बचावले. अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अपघातातील मृत व्यक्तींचे मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत.

पोलिसांनी या अपघात प्रकरणी ट्रेलर चालकाला बिहार बॉर्डरवरून अटक केली आहे. पोलिसांनी पुढील कायदेशीर कारवाई सुरु केली आहे. अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने लालजी डोम यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group