उत्तर प्रदेशमधल्या हाथरसमध्ये एक दुर्देवी दुर्घटना घडली आहे. एका सत्संग कार्यक्रमात चेंगराचेंगरी होऊन 27 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. मृतांमध्ये 25 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश आहे. हाथरसमधल्या रतीभानपूरमध्ये एका सत्संग कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रम सुरु असतानाच अचानक गोंधळ उडाला. यावेळी चेंगराचेंगरी होऊन महिला आणि लहान मुलं चिरडली गेली. यात अनेकजण जखमी झाले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
सत्संग कार्यक्रमात चेंगराचेंगरी
रतीभानपूरमध्ये भोले बाबांच्या सत्संग कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात शेकडोच्या संख्येने भक्त सहभागी झाले होते. गर्दी आणि प्रचंड उष्णतेने अनेक भक्त बेशुद्ध पडले. त्यामुळे गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशानस दाखल झाले.
हाथरसमध्ये मोठी दुर्घटना
उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. चेंगराचेंगरीत अनेकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. जिथे ही चेंगराचेंगरी झाली तिथे सत्संग सुरु होता. ही घटना हाथरसच्या रतिभानपूर भागातील असल्याची माहिती आहे. भोले बाबांच्या सत्संगाचा समारोप सोहळा सुरू असतानाच चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या लोकांना उपचारासाठी एटा मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आलं आहे.
महिला आणि लहान मुलांचा समावेश
उत्तर प्रदेशच्या हाथरस जिल्ह्यातील सिकंदरराव पोलीस स्टेशन हद्दीतील फुलराई गावात भोले बाबांच्या सत्संगात चेंगराचेंगरी झाली, मृतांमध्ये दोन पुरुष आणि 25 महिलांचा समावेश आहे. अनेक जण जखमी झाले असून त्यामध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे.