धक्कादायक ! भाऊ बहिणीच्या नात्याला काळिमा; सकाळी राखी बांधली आणि संध्याकाळी....
धक्कादायक ! भाऊ बहिणीच्या नात्याला काळिमा; सकाळी राखी बांधली आणि संध्याकाळी....
img
वैष्णवी सांगळे
दैनिक भ्रमर : उत्तर प्रदेशातील औरैया भावा-बहिणीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका भावाने शरमेनं मान खाल घालणारं कृत्य केलं आहे, ते ही रक्षाबंधनाच्या दिवशी. नराधमाने सकाळी बहिणीकडून राखी बांधली आणि रात्री तिच्यावर अत्याचार केले त्यानंतर तिची हत्या केली. 

नेमकं काय घडलं ? 
ही घटना उत्तर प्रदेशातील औरैयाच्या बिधुना पोलीस स्टेशन परिसरातील आहे. 10 ऑगस्ट रोजी पोलीस स्टेशन परिसरातील एका गावात 14 वर्षांच्या मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांना घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये बलात्कार करून चिमुरडीचा गळा दाबून हत्या झाल्याचे समोर आले. यानंतर, बिधुना कोतवाली पोलिस आणि घटनेच्या तपासावेळी अनेक संशयितांना ताब्यात घेतले आणि त्यांची चौकशी केली. चौकशीदरम्यान, मृत मुलीच्या काकाचा मुलगा सुरजीत याने कबूल केले की त्याने त्याच्या बहिणीवर बलात्कार करून तिची हत्या केली होती.

जया बच्चन यांनी सेल्फी घेणाऱ्याला दिला धक्का; कंगना रनौतची तिखट प्रतिक्रिया

आरोपी सुरजीतने सांगितले की, मृतक त्याच्या काकाची मुलगी होती. रक्षाबंधनाच्या दिवशी तो दिवसा घरी आला आणि तिला राखी बांधली. त्याला दारू पिण्याचे व्यसन आहे. त्या दिवशीही त्याने रात्री खूप दारू पिली. त्यानंतर रात्री पोटदुखीमुळे तो घरासमोरील शेतात शौचास गेला. यानंतर, तो त्याची बहीण झोपलेल्या खाटेकडे गेला त्याने त्याच्या बहिणीला स्पर्श करताच ती जागी झाली. त्यानंतर त्याने बहिणीचे तोंड दाबले आणि तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर, सर्वांना समजेल या भीतीने त्याने तिचा गळा दाबून तिचा खून केला. पोलिसांनी आता या नराधम सुरजितला ताब्यात घेतलं आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group