Nashik : प्राध्यापकाचे महिलेवर दीड वर्ष लैंगिक अत्याचार
Nashik : प्राध्यापकाचे महिलेवर दीड वर्ष लैंगिक अत्याचार
img
दैनिक भ्रमर

नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- शरीरसंबंधाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ते व्हायरल करण्याची धमकी देऊन महिलेवर दीड वर्षे बळजबरीने लैंगिक अत्याचार करणार्‍या प्राध्यापकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की आरोपी अमर मारुती ठोंबरे (रा. शुभारंभ अपार्टमेंट, इरिगेशन कॉलनी, मखमलाबाद) याने राहत्या घरी पीडित महिलेची इच्छा नसताना जबरदस्तीने बळजबरीने शरीरसंबंध प्रस्थापित केले व ते प्रकार करीत असतानाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले.

ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले. तसेच मारहाण करून शिवीगाळ केली. हा प्रकार दि. 30 ऑगस्ट 2023 ते जानेवारी 2025 यादरम्यानच्या कालावधीत घडला. या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीनुसार आरोपी अमर ठोंबरे याच्याविरुद्ध म्हसरूळ पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक तुरे करीत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group