मालेगाव पुन्हा हादरलं ! १४ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार
मालेगाव पुन्हा हादरलं ! १४ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार
img
वैष्णवी सांगळे
नाशिकच्या मालेगावमधील एका ३ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. ही घटना ताजी आहेच. आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी ही मागणी असतानाच मालेगावच्या आणखी एका लेकीवर अत्याचाराची वाईट वेळ ओढवली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक येथील मालेगाव परिसरात एका ५४ वर्षीय व्यक्तीने १४ वर्षीय मुलीला रस्त्यात गाठलं. तिला फूस लावून आपल्या दुचाकीवर बळजबरीने बसवलं. त्यानंतर दुचाकी सुसाट पळवत त्याने मुलीला गिरणा धरणावर नेले. आणि तेथे नेऊन त्याने त्यामुलीवर बलात्कार केला.

यादरम्यान मुलीच्या आरडाओरड्याने स्थानिकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यांनी तडक आवाजाच्या दिशेने धाव घेत आरोपीला रंगे हात पकडलं. शिवाय नराधमाच्या तावडीतून मुलीची सुटका देखील केली. त्यानंतर गावकऱ्यांनी घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपीला बेड्या ठोकल्या.तसेच पीडित मुलीला पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. 

या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून नराधमाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. याशिवाय आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनं कायद्याचा धाक नागरिकांना राहिलेला नसल्याचंच अधोरेखित होतंय. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group