सराफा बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेत. सोन्यांच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ लागत आहे. अशातच आज २० जानेवारी २०२६ रोजी, मंगळवारी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात मोठा फेरबदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. सोन्याच्या दरात वाढ झाली आहे तर चांदीच्या दरातही बदल झाल्याचं पाहायला मिळालं आहे.
भारतात आज सोन्याची किंमत किती ?
सराफा बाजार उघडताच सोन्याच्या किंमतीत पुन्हा वाढ झाली. २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम ₹१४,७२८ आहे. सोमवारच्या तुलनेत यामध्ये १०४ रूपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. तर २२ कॅरेट सोन्याची किंमत ९५ रूपयांनी वाढून प्रति ग्रॅम ₹१३,५०० रूपये झाली आहे. १८ कॅरेट सोन्याची किंमतप्रति ग्रॅम ₹११,०४६ इतकी झाली आहे. सोमवरच्या तुलनेत ही किंमत ७८ रूपयांनी जास्त नोंदवण्यात आली.
२४ कॅरेट सोन्याचा दर - २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा १०४० रूपयांनी वाढली आहे. आज २४ कॅरेट सोनं प्रति तोळा १,४७,२८० रुपयांना मिळेल. तर प्रति ग्रॅम सोन्याची किंमत १४,७२८ रुपये आहे.
२२ कॅरेट सोन्याचा दर - २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा १,३५,००० रुपये इतकी आहे. सोमवारच्या तुलनेत सोन्यामध्ये ९५० रुपयांनी वाढ नोंदवण्यात आली. २२ कॅरेट सोन्याची किंमत ९५ रूपयांनी वाढून प्रति ग्रॅम १३,५०० रुपये आहे.
१८ कॅरेट सोन्याचा भाव - आज, १८ कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम ₹११,०४६ झाली आहे. प्रति तोळा १८ कॅरेटचे सोनं ₹१,१०,४६०रूपयांना झालेय. यामध्ये ७८० रूपयांची वाढ नोंदवण्यात आली.