गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात चढ उतार पहायला मिळत आहे. पण सोन्याच्या दरात झालेली वाढ ही सर्वसामान्यांच्या खिशाला न परवडणारी आहे. सोन्याचे दर कालपासून घसरत आहेत. आजदेखील सोन्याचे दर घसरले आहेत. आज सोन्याच्या दरात प्रति तोळ्यामागे ३,०५० रुपयांची घसरण झाली आहे.
२४ कॅरेट सोन्याचे दर - सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ३०५० रुपयांनी घसरले आहेत. हे दर १,३६,२०० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर २,४४० रुपयांची घसरले असून हे दर १,०८,९६० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर ३०,५०० रुपयांनी घसरले आहेत. हे दर १३,६२,००० रुपये झाले आहेत.
२२ कॅरेटचे सोन्याचे दर - २२ कॅरेट सोन्याचे दर २८०० रुपयांनी घसरले आहेत. हे दर १,२४,८५० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर २,२४० रुपयांनी कमी झाले असून हे दर ९९,८८० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर २८,००० रुपयांनी घसरले आहेत. हे दर १२,४८,५०० रुपये झाले आहेत.
१८ कॅरेट सोन्याचे दर - आज १८ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे २५१० रुपयांनी घसरले आहेत. हे दर १,०१,९३० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर २००८ रुपयांनी घसरले असून ८१,५४४ रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर २५,१०० रुपयांनी घसरले असून १०,१९,३०० रुपये झाले आहेत.